Kolhapur News: केंद्र सरकारने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ऑक्टोबरपेक्षा कमी कोटा जाहीर केल्याने यंदाच्या दिवाळीत साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. केंद्राने ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी २४ लाख टनांचा विक्री कोटा दिला आहे. गेल्या वर्षी २५.२५ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला होता. गेल्या वर्षीपेक्षा कोटा कमी दिल्याने यंदा साखरेचे दर वाढतील असा अंदाज आहे..सध्या बाजारात साखरेचा दर ३८५० ते ३९०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे. यात आणखी ५० ते १०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगाची आहे. पाइपलाइनमध्ये विशेष साखरेचा साठा नसल्याने आगामी दिवसांत बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी साखरेची नियोजन बद्ध विक्री केल्यास कारखान्यांना विक्रीतून ऑक्टोबर मध्ये चांगली रक्कम येण्याची शक्यता आहे. दर चार हजार रुपयांवर गेल्यास गेल्या हंगामातील कारखान्यांवरील आर्थिक ताण कमी होईलच या बरोबरच आगामी हंगामात ऊस उत्पादकांनी वेळेवर एफआरपी देणे शक्य होईल, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे..Sugar MSP: साखरेची विक्री किंमत किलोला ४०.२ रुपये करावी, 'इस्मा'ची मागणी, वाढत्या उत्पादन खर्चाचा दिला हवाला.गेल्या दोन महिन्यांपासून साखरेचे दर वाढले आहेत. ऑगष्टपासून साखरेचे दर सातत्याने कमी अधिक वाढले आहेत. केंद्राने गेल्या सहा महिन्यांपासून गेल्या वर्षीपेक्षा कमी विक्री कोटे दिले आहेत. प्रत्येक महिन्यात एक ते दीड लाख टनांची घट केली आहे. गेल्या वर्षी साखर उत्पादन कमी झाल्याने केंद्राने सावधगिरीची भूमिका घेत देशांतर्गत बाजारात संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. यामुळे दरात फारशी पडझड झाली नाही..Sugar Industry: साखर कारखाने शेतकऱ्यांशी डिजिटल कनेक्ट करा.सध्याचा साखर साठा विचारात घेतल्यास येत्या दोन महिन्यांसाठी पुरेल इतकी साखर देशात उपलब्ध आहे. सप्टेंबर २०२५ अखेर देशांतर्गत साखर साठा साधारण ६५ ते ७० लाख टन आहे. साखर साठा पुरेसा व्हावा या हेतूने केंद्राने गरजेइतक्या कोट्याची विक्री परवानगी दिली आहे. यामुळे दर ३९०० रुपयापर्यंत वाढले आहेत. सध्या एमएसपी पेक्षा साखरेचे दर ७०० ते ८०० रुपयांनी जास्त आहेत..साखरेची एमएसपी ४००० रुपये करादरम्यान साखर उद्योगाच्या संघटनांनी साखरेचे किमान विक्री दर तातडीने वाढविण्याची मागणी केली आहे. साखरेचा दर किमान ४,००० रुपये प्रति क्विंटल करण्यात यावा, असे संघटनांनी म्हटले आहे. फेब्रुवारी २०१९ पासून साखरेचा एमएसपी ३१०० रुपये प्रति क्विंटवर स्थिर आहे. उसाची एफआरपी दरवर्षी वाढत गेल्याने साखर उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.२०१८-१९ पासून आतापर्यंत उसाच्या एफआरपीमध्ये २९ टक्क्यांनी वाढ झाली. २०२५-२६ हंगामासाठी तो ३५५ रुपये प्रति क्विंटल झाला आहे. त्याउलट साखरेचा एमएसपी स्थिर आहे. उत्पादन खर्च व विक्री खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने साखर उद्योग अडचणीत आला आहे. यामुळे एमएसपी तातडीने वाढवावी, अशी मागणी इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (ईस्मा) केंद्राकडे केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.