Kolhapur News: संक्रातीच्या पार्श्वभूमीवर येथील गुळाला विविध भागांतून मागणी वाढली. संक्रांतीच्या अगोदर चार दिवस झालेल्या सौद्यांमध्ये गूळ बाजारात काहीशी तेजी दिसून आली. येथे दररोज पंचवीस ते तीस हजार गूळ रव्यांची आवक संक्रांतीच्या अगोदरच्या तीन ते चार दिवसांमध्ये झाली आहे. .संक्रांत हा सण गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. उत्तरायण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणात तीळ–गुळाचे पदार्थ, चुरमा, लाडू, मिठाई आणि पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी गुळाची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. याच पार्श्वभूमीवर, दरवर्षी संक्रांतीच्या काळात गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्रातील गूळ बाजारांकडे मोठ्या प्रमाणात मागणी येते..Jaggery Production: उसापासून गूळ निर्मितीचे शास्त्रीय तंत्र.जानेवारीच्या दुसऱ्या सप्ताहापासून गुळाच्या नियमित आवकेत काहीशी वाढ झाली. ही वाढ संक्रांतीच्या दोन ते तीन दिवस अगोदरपर्यंत होती. गुजरातमध्ये भोगी व संक्रांतीला पूर्ण बाजारपेठ बंद असते. यामुळे दोन ते तीन दिवस अगोदरच खरेदी होते. यामुळे या कालावधीत टप्प्याटप्याने दरात वाढ झाली..पहिल्या दर्जाच्या गुळास क्विंटलला ४७०० ते ४८००, दुसऱ्या दर्जास ४५०० ते ४७००, तिसऱ्या दर्जास ४१०० ते ४४००, तर चौथ्या दर्जाच्या गुळास ३७०० ते ४००० रुपये दर मिळत आहे. संक्रांतीपूर्वी दहा दिवस मागणीमुळे गुळाचा पुरवठाही वाढतो..Jaggery Market: सांगली बाजार समितीत नव्या गुळाची आवक.यंदा कोल्हापूर भागात गुऱ्हाळांची संख्या कमी झाली आहे. याबरोबरच कर्नाटक भागातूनही मोठ्या प्रमाणात गूळ गुजरातला जात आहे. परिणामी कोल्हापूरच्या गुळाला एकत्रित अशी मागणी राहिली नाही. यामुळे एकदम मागणी अशी आली नसल्याची माहिती गुळबाजारातून देण्यात आली..चिक्की गुळाचे प्रमाण कमीदरवर्षी कोल्हापूर परिसरातील अनेक गुऱ्हाळे संक्रांतीसाठी चिक्की गूळ तयार करतात. अलीकडच्या काळात सेंद्रीय गूळ तयार करणारी गुऱ्हाळे कमी झाल्याने दर्जेदार चिक्की गुळाचेही प्रमाण कमी राहिले. यंदा अतिशय कमी प्रमाणात हा गूळ उपलब्ध झाल्याचे गूळ बाजारातून सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.