Jalgaon News: खानदेशात नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला. यानंतर थंडी वाढली. प्रतिकूल वातावरणाचा फटका कलिंगड पिकास बसला असून, अनेक भागांत पीक काढून फेकावे लागले आहे. यामुळे सद्यःस्थितीत कलिंगड आवक अल्प आहे. खानदेशात कलिंगडास सध्या जागेवर २० ते २२ रुपये प्रति किलोचा दर आहे. .कलिंगड लागवड यंदा खानदेशात स्थिर आहे. सुमारे सात हजार हेक्टरवर ही लागवड झाली आहे. लागवड नोव्हेंबर ते जानेवारीच्या अखेरपर्यंत झाली आहे. सध्या काही भागात उन्हाळ लागवड सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवड सुमारे चार हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. जळगावात जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, यावल, रावेर या भागात कलिंगड पीक अधिक आहे. तसेच पाचोरा, जळगाव, एरंडोल, धरणगाव भागातही लागवड झाली आहे..Watermelon Farming: खानदेशात आगाप कलिंगडास फटका.धुळ्यात शिरपूर, साक्री, धुळे भागात कलिंगड पीक आहे. नंदुरबारातही तळोदा, शहादा भागात कलिंगड पीक आहे. धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरपेक्षा अधिकचे कलिंगड पीक आहे. सर्वाधिक लागवड नोव्हेंबरमध्ये झाली आहे. यानंतर जानेवारीतही बऱ्यापैकी लागवड झाली आहे..Watermelon Cultivation: टरबूज लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल.नोव्हेंबरमधील लागवडीच्या पिकास फटकानोव्हेंबरच्या सुरुवातीला अनेकांनी थेट रोपांची लागवड केली. नाशिक, स्थानिक व अन्य भागांतील रोपवाटिकांतून ही रोपे आली. यात नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला होता. लागलीच या लागवडी झाल्या. यानंतर थंडी वाढली. किमान तापमान धुळे, जळगावातील अनेक भागांत काही दिवस सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते..उष्णता कमी होती. दिवसा गारठा होता. अशात काही वाणांच्या कलिंगड पिकात फूलगळ झाली. रोगराई वाढली. यामुळे कलिंगडाची हानी झाली आहे. चोपडा, शहादा व अन्य भागांतील काही शेतकऱ्यांना पीक काढून फेकावे लागले. त्यांची मोठी वित्तीय हानी झाली. अन्य भागात कलिंगड पीकवाढीत अडथळे आले..पीकवाढ थांबणे, फुले कमी लागले, मधमाशा न येणे, फळे तयार न होणे, वेलांची हानी अशा अनेक समस्या आल्या. सात ते आठ फवारण्या घेऊनही अनेक समस्या पिकात कायम राहिल्या. यामुळे उत्पादन अजूनही हाती आलेले नाही. फळे तयार होण्याची गती कमी आहे. फळांची संख्याही कमी आहे. यामुळे उत्पादन कमी आहे. परिणामी खानदेशात कलिंगड आवक अल्प आहे. यामुळे कलिंगडाचे दर खानदेशात जागेवर किंवा शिवार खरेदीत २० ते २२ रुपये प्रति किलो, असे आहेत. दर टिकून आहेत. पण उत्पादन नसल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे दिसत आहे, अशी माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.