Tendu Leaves Collection: गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन हंगाम सुरू होत असताना यंदा दरात तब्बल ७५० रुपयांची वाढ झाली असून, प्रति गोणी दर ५ हजार रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे आदिवासी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. मात्र संकलन प्रक्रियेत काही ठिकाणी विलंब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली..जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनासाठी ग्रामसभांची तयारी अंतिम टप्प्यात असली तरी लिलाव प्रक्रियेतील विलंबामुळे संकलनास उशीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष संकलन सुरू होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील एकूण ग्रामसभांपैकी ३१५ ग्रामसभांनी अद्याप संकलनासाठी पर्याय निवडलेला नाही. सर्वाधिक ग्रामसभा एटापल्ली, भामरागड व अहेरी तालुक्यांत आहेत..Illegal Tree Cutting: ठाण्यात २६ वृक्षांची बेकायदा वृक्षतोड.अहेरी व मुलचेरा तालुक्यातील प्रत्येकी २७ ग्रामसभांनी पर्याय न निवडल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील २७ गावांमध्ये तेंदूपत्ता संकलन वन विभागाच्या थेट नियंत्रणाखाली केले जाते. यामध्ये काही गावांनी पेसा क्षेत्र (पंचायत विस्तार : अनुसूचित क्षेत्र), तर काहींनी नॉन-पेसा क्षेत्रांत सहभाग नोंदविला आहे..Tendu Collection: हंगामात २०० कोटी रुपयांचे तेंदूपाने संकलन .त्यातच दरवाढीमुळे संकलनासाठी ग्रामीण भागात उत्साह आहे; मात्र लिलावांच्या जाहिरातीत झालेला विलंब आणि प्रक्रियात्मक अडचणींमुळे प्रत्यक्ष संकलन उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकंदरीत, दरवाढ ही सकारात्मक बाब असली तरी नियोजनातील विलंब टाळल्यासच शेतकरी व मजुरांना याचा पूर्ण लाभ मिळू शकतो, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे..पाच वर्षांतील दरवाढ (प्रति गोणी रुपये)वर्ष शासकीय खासगी२०२२ ३४०० ३४५०२०२३ ३६५० ३७००२०२४ ३९०० ३९५०२०२५ ४२५० ४३००२०२६ ५००० ५०५०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.