Sugarcane FRP: उसाच्या एफआरपीमध्ये क्विंटलमागे १० रुपयांची वाढ
Government Sugarcane Price Policy: केंद्र सरकारने २०२६-२७ च्या साखर हंगामासाठी उसाच्या रास्त व किफायतशीर दरात (एफआरपी) क्विंटलमागे १० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आता १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी उसाची एफआरपी ३६५ रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला आहे.