Kolhapur News: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या साखरेचे दर तेजीत आहेत. सध्या देशात साखरेस क्विंटलला सरासरी ३८०० ते ३९०० रुपये इतके दर आहेत. काही राज्यांमध्ये साखरेचे दर ४००० रुपयांवर पोचले आहेत..दिवाळी जवळ येईल तशी साखरेच्या दरात आणखी सुधारणा होण्याचा अंदाज आहे. देशातील साखर हंगाम एक आक्टोबरपासून सुरू झाला आहे. उत्तर प्रदेश वगळता अन्य कोणत्याही महत्त्वाच्या राज्यातील साखर हंगाम अद्याप सुरू झाला नाही..Sugar Production Decline: अतिवृष्टीचा फटका ऊसाला; राज्यात यंदा साखरेचे उत्पादन घटणार! .यंदाची साखर नोव्हेंबर नंतरच बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता असल्याने ऑक्टोबर अखेरपर्यंत तरी साखरेचे दर वाढलेले राहतील, अशी शक्यता साखर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र या भागांमध्ये झालेल्या पावसामुळे यंदा साखरेचे गाळप सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे..अजूनही काही भागात कमी-अधिक पाऊस सुरू आहे. यामुळे वाफसा स्थिती येण्यासाठी अडथळे येत आहेत. या परिस्थितीमुळे गाळप व साखर उत्पादन किमान पंधरा दिवस लांबण्याची शक्यता आहे. साखर कारखाने सध्या गाळप हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. तोडणी यंत्रणांबरोबर सातत्याने करार व बोलणी सुरू असल्याचे चित्र अनेक कारखान्यांमध्ये आहे. अनेक ठिकाणी बॉयलर प्रदीपन होत आहे..सध्या दर चांगला असल्याने कारखाने साखर विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. मर्यादित उपलब्धता असूनही बाजारातून चांगली मागणी कायम असल्याने दरात तेजी कायम राहण्याची शक्यता साखर बाजारातील सूत्रांनी व्यक्त केली. पंजाब, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील भाव उच्चांकी स्तरावर आहेत. महाराष्ट्रातील दर तुलनेने कमी आहेत..Sugar Price: दिवाळीत साखरेचा गोडवा वाढणार.‘केंद्राकडून हंगामाबाबत अद्याप स्पष्ट धोरण नाही’सध्या अनेक राज्यांमध्ये अति पाऊस झाल्याने उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. साखर कारखाना संघटनांचे प्रतिनिधी मात्र अजूनही यंदा साखर उत्पादन जादा होईल या म्हणण्यावर ठाम आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांतील जोरदार पावसामुळे उसाची वाढ खुंटल्याने यंदाही गेल्या वर्षीसारखीच उत्पादन घटीची शक्यता ऊस उत्पादकांकडून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये पावसाने ऊस उत्पादकांचे गणित बिघडविले आहे..साखरेच्या एमएसपी वाढीबरोबरच इथेनॉल दरात वाढ करण्याची मागणी साखर कारखानदारांची असली तरी सध्या तरी केंद्राकडून जलद गतीने निर्णय करण्याबाबत अद्याप तरी हालचाली नसल्याचे चित्र आहे. हंगामाने वेग घेतल्यानंतर निर्यातीबरोबर अन्य काही धोरणात्मक निर्णय होऊ शकतात, असे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी सांगितले..सध्याचे एक्स-मिल साखरदर असे (प्रति क्विंटल)राज्य एस ३० एम- ३०महाराष्ट्र ३८७०-३९०० ३९२०-३९४०कर्नाटक ३९५०-३९६० ४०१०- -उत्तर प्रदेश – ४०७०-४११०गुजरात ३९०१-३९५१ ३९०१-३९५१तमिळनाडू ४०२५ - ४१०० ४०७५ - ४१५०मध्य प्रदेश ४०१० - ४०२० ४०८०- ४०९०पंजाब – ४१५० - ४३५१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.