Maharashtra Sugar Market: देशांतर्गत बाजारात साखरेला चांगली मागणी असल्याने दर स्थिर आहेत. सध्या साखरेचे दर स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांतील तेजीच्या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्या सत्रात साखरेच्या किमतींमध्ये कोणताही मोठा बदल झाला नसला, तरी बाजारातील वातावरण सकारात्मक असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले..हंगामाच्या (२०२५-२६) उत्तरार्धात साखरेची उपलब्धता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून अंतिम साठा कमी राहण्याची भीती आहे. यामुळे कारखाने साखर विक्रीबाबत सावध भूमिका घेत आहेत. परिणामी, बाजारात साखरेचा मोठा पुरवठा होत नसल्याने किमतींना आधार मिळत आहे..Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई.उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर बाजारात एम-ग्रेड साखरेचे दर प्रति क्विंटल ४०८० ते ४१८० रुपयांवर स्थिर राहिले. तर कोल्हापूर बाजारात एस-ग्रेड साखरेचे दर ३८३० ते ३८६० रुपये प्रति क्विंटल इतके नोंदविण्यात आले. दोन्ही प्रमुख बाजारपेठांमध्ये दर मागील सत्राप्रमाणेच कायम राहिल्याचे दिसून आले..Maharashtra Sugar Quota: महाराष्ट्राच्या साखर कोट्यात वाढ.सणासुदीच्या हंगामापूर्वी मोठे ग्राहक, व्यापारी आणि साठेबाजांकडून खरेदी वाढत असल्याने बाजाराला बळ मिळत आहे. त्यामुळे साखरेच्या किमतींना आधार कायम आहे. बाजाराचे लक्ष महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांतील मॉन्सूनच्या प्रगतीकडे लागले आहे. आगामी हंगामातील ऊस क्षेत्र वाढ आणि साखर उत्पादनावर हवामानाचा मोठा प्रभाव राहणार असल्याने पावसाची स्थिती बाजाराच्या पुढील दिशेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या दर स्थिर राहण्याची शक्यता असली तरी उत्पादनाबाबतची चिंता वाढल्यास साखरेला आणखी तेजी मिळू शकते..पंजाबमध्ये एम-३० साखरेला ४३२१ रुपये दरमहाराष्ट्रात एस-३० साखरेचा दर ३७४५ ते ३७६५ प्रति क्विंटल असून एम-३० साखरेचा दर ३८४५ ते ३८६५ इतका आहे. दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये दर तुलनेने अधिक आहेत. गेल्या आठवड्यात पंजाबमध्ये एम-३० साखरेचा सर्वाधिक दर ४३२१ प्रति क्विंटल नोंदविला गेला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.