Sugar Price Increase: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर साखर दरात हळूहळू तेजी येत आहे. केंद्राने गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी कोटा दिल्याचा सकारात्मक परिणाम साखर दराच्या वाढीवर होत असल्याचे चित्र आहे. एप्रिलमध्ये किंमती स्थिर होत्या. मे महिन्यापासून साखरेच्या किमतीत फार वाढ नसली तरी क्विंटलला दहा ते वीस रुपयांनी अल्प वाढ सुरू आहे. यामुळे साखर कारखानदारांत काहीसे समाधान आहे..सध्या देशातील साखर हंगाम संपल्याने उत्पादन थांबले आहे. यामुळे पुढील हंगामापर्यंत नवी साखर तयार होण्याची शक्यता नसल्याने साखरेच्या बाजारात हळूहळू तेजी येण्याची चिन्हे आहेत..Sugar Quota: महाराष्ट्र-कर्नाटकच्या साखर कोट्यात मोठी कपात.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर व सण समारंभामुळे साखरेला मागणी वाढत असल्याचे देशभरात चित्र आहे. विशेषतः उन्हाळ्यामुळे थंड पेये, आइस्क्रीम आणि प्रक्रिया उद्योगांकडून मागणीत वाढ होत आहे..Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ .देशांतर्गत बाजारपेठेत सध्या साखरेचे दर क्विंटलला ३७०० ते ३८०० रुपये इतके आहेत. यंदा साखर कारखाने गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर बंद झाल्यामुळे साखरेचे दर चढेच राहण्याची शक्यता बाजार सूत्रांची आहे. केंद्राने अजूनही साखर उद्योगाची साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) वाढविण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केली. अनेकदा केंद्रीय स्तरावर चर्चेच्या फेऱ्या झाल्या. संबंधित मंत्री व प्रशासन स्तरावरही एमएसपी वाढीबाबत आश्वासने देण्यात आली. मात्र चर्चा अंतिम टप्प्यात आल्यानंतर हा निर्णय मागे पडत गेला..‘एमएसपी’ वाढविण्याची मागणीहंगाम संपल्यानंतर साखर उद्योगाकडून एमएसपी वाढीची मागणी नव्याने होत आहे. युद्धामुळे अनेक पदार्थांची दरवाढ झाली आहे. परंतु साखरेची नैसर्गिक दरवाढ वगळता किमतीत वाढ नसल्याने कारखाने अडचणीत आहेत. केंद्राने एमएसपीत वाढ तातडीने करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.