Latur News : मागील आठवड्यात सोयाबीनचा बाजारभाव हमीभावाच्या काठावर आला. यामुळे हमीभावाने सोयाबीन खरेदी करणारी केंद्रे ओस पडली असून बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. .सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये क्विंटल असून बाजारात शुक्रवारी (ता. ९) सोयाबीनचा कमाल भाव ५ हजार २७६ रुपये क्विंटलपर्यंत गेला होता. बाजारात सतत सोयाबीनला ५ हजार रुपये क्विंटलच्या पुढेच भाव मिळत असल्याने शेतकरी हमीभाव केंद्राऐवजी काही प्रमाणात बाजाराकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. येत्या काळात शेतकऱ्यांना आणखी बाजारभाव वाढण्याची आशा आहे..Soybean New Variety: सोयाबीनच्या एमएयूएस-७२५ वाणाची ‘वनामकृवि’च्या नावे नोंदणी.मागील पंधरा दिवसांपासून बाजारात सोयाबीनचे भाव ५ हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले आहेत. लातूरच्या आडत बाजारात गुरुवारी (ता. ८) सोयाबीनची १० हजार ९२४ क्विंटल आवक होती, तर सोयाबीनला ५ हजार रुपये कमाल व चार हजार सहाशे रुपये किमान भाव होता. शुक्रवारी ११ हजार १५८ क्विंटल आवक होती, तर कमाल भाव ५ हजार २७६ व किमान भाव ४ हजार ३०० रुपये होता..शनिवारी (ता. १०) १३ हजार ४५७ क्विंटलची आवक होऊन कमाल भाव ५ हजार १८१, किमान भाव चार हजार २६० तर सर्वसाधारण भाव ५ हजार ४० रुपये क्विंटल होता. सोमवारचे (ता. १२) कमाल भाव ५ हजार १५७ रुपये, तर किमान ४ हजार ६५० रुपये व सर्वसाधारण भाव ५ हजार ५० रुपये प्रति क्विंटल होते. सुमारे १२ हजार क्विंटल सोयाबीनची आवक यावेळी झाली..Soybean Procurement: सांगलीत दोन केंद्रांवर सतराशे क्विंटल सोयाबीन खरेदी.यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीनच्या विक्रीसाठी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली असून मळणी केलेले सोयाबीन घरातच थप्पी लावून ठेवले आहे, तर काहींनी सोयाबीनची मळणी करण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. बाजारात भावाची होणारी चढ-उतार पाहता येत्या काळात सोयाबीनच्या बाजारभावात आणखी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. बाजारातही भाव वाढीचीच चर्चा सुरू आहे. यामुळेच हमीभावाने सोयाबीनच्या विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना केंद्रावर सोयाबीन घेऊन येण्यासाठी मेसेज आले तरी त्यांनी ब्रेक घेतल्याचे चित्र दिसत आहे..शेतकऱ्यांची द्विधा मनःस्थितीसोयाबीनचे भाव पाच हजार रुपयांच्या पुढे गेले असले तरी अजून हमीभावाच्या पुढे सरकलेले नाहीत. अनेक दिवसांची ही परिस्थिती लक्षात घेता सोयाबीनचे भाव नक्की वाढतील का, याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. यामुळे वजन कमी होण्याच्या आधी सोयाबीनची बाजारात किंवा केंद्रावर विक्री करावी की कसे, याबाबत शेतकऱ्यांची द्विधा मनःस्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.