Market Bulletin:सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा सोयाबीनच्या भावात कालपासून काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सोयाबीनची बाजारातील उपलब्धता कमी झालेली आहे. तर आयातीविषयी सरकारने ठोस निर्णय न घेतल्यामुळे उद्योगांना गरज भागविण्यासाठी भाव वाढवून सोयाबीनची खरेदी करावी लागत आहे. यामुळे सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमधील सोयाबीनचा भाव ६ हजार ८०० ते ७ हजारांच्या दरम्यान पोचला आहे. पुढील काळातही सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. यामुळे सोयाबीनचा भाव टिकून राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस स्थिरावलादेशातील बाजारात कापसाचा भाव काहीसा स्थिरावला आहे. सीसीआयने मागील काही दिवसांपासून रुई विक्रीचा भाव कमी केलेला आहे. सरकारने आयात शुल्क काढल्यापासून सीसीआयने कापूस खंडाचा भाव ६९ हजार रुपयांपासून ६२ हजार रुपयांपर्यंत कमी केला आहे. सरकीला उठाव असल्याने आणि भाव स्थिर असल्याने कच्चा कापसाला बाजारात ८ हजार ४०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव ७६ सेंटवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे. देशात मात्र भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. मात्र कापसाचा बाजार पुढील काळात स्थिरावू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: कांदा दर स्थिर; सोयाबीन आजही स्थिर, कापसात चढ उतार, केळीला उठाव तर तूर दबावातच.कांदा दर टिकून देशातील बाजारात कांदा भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावल्याचे दिसत आहे. कांद्याची बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झालेली आहे. तर दुसरीकडे नाफेड आणि एनसीसीएफ बाजारात कांदा खरेदी करत आहेत. या खरेदीला अद्याप वेग आलेला नसला तरी बाजारात याचा सकारात्मक आधार दिसत आहे. कांदा भाव मागील दोन दिवसात काहीसे वाढलेले आहेत. कांद्याचा सरासरी भाव राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये सध्या १३०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. पुढील काळात बाजारातील कांदा आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच खरिपातील कांदा लागवडीवर पावसाचा कसा परिणाम होतो, याचाही कांदा भावाला आधार मिळेल, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले.कोथिंबीर सुधारलीराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कोथिंबीरची आवक कमी झालेली आहे. कोथिंबीर पिकाला वाढलेली उष्णता आणि पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तर दुसरीकडे कोथिंबीरला उठाव चांगला मिळत आहे. यामुळे कोथिंबरच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. सध्या बाजारात कोथिंबीरला प्रतिशेकडा १५०० ते १७०० रुपये भाव मिळत आहे. तर प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ४ हजारांपर्यंत वेगवेगळ्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे कोथिंबीरला भाव मिळत आहे. पुढील काळात कोथिंबीरची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोथिंबीरचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज कोथिंबर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .गवारची आवक कमीचराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कमीच आहे. तर उठाव असल्याने गवारचा भाव टिकून आहे. गवारला मागणी वर्षभर बऱ्यापैकी दर मिळाल्याचे शेतकरी सांगत आहे. गवारची लागवड सातत्याने कमीच राहीली. तसेच पिकाला पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसत आला. याचा परिणाम बाजारातील आवकेवर झाला आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. गवारची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारचा भावही टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.