Agriculture Commodity Market : सोयाबीन, तुरीच्या भावातील घसरण कायम

Soybean Market : या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,६४६ वर आली आहे.
Soybean and Tur
Soybean and TurAgrowon
Published on
Updated on

फ्युचर्स किमतीः सप्ताह- १२ ते १८ ऑक्टोबर, २०२४

या सप्ताहात NCDEX मध्ये पिवळ्या वाटाण्यासाठी फ्युचर्स व्यवहार सुरू झाले. इतर कडधान्यांमध्येही असे व्यवहार लवकर सुरू व्हावेत. कापूस, मका, मूग व सोयाबीन यांची आवक आता वाढत आहे.

या सप्ताहात मूग वगळता सर्व पिकांचे भाव घसरले. मुगाचे भाव किंचित वाढले. तुरीच्या भावातील घसरण याही सप्ताहात चालू राहिली. आता तूर ८,७०० पर्यंत आली आहे. सोयाबीन व मूग यांचे भाव हमीभावापेक्षा अजूनही कमी आहेत.

१८ ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात २.५ टक्क्यांनी घसरून रु. ५६,४०० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.२ टक्क्यांनी घसरून रु. ५६,३०० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स भाव ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ५६,४६० वर आले आहेत. जानेवारी फ्युचर्स भाव रु. ५९,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.८ टक्क्यांनी अधिक आहेत. भविष्यात कापसाचे भाव कमी होतील असा अंदाज हे भाव दर्शवितात. कापसाची आवक वाढू लागली आहे.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात ०.९ टक्क्यांनी घसरून रु. १,५३४ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. १,५५५ वर आले आहेत तर एप्रिल फ्युचर्स रु. १,५७४ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.६ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. एप्रिल फ्युचर्स या हमीभावापेक्षा रु. ७० ने अधिक आहेत.

Soybean and Tur
Cotton Soybean Scheme : कापूस, सोयाबीन योजनेसाठी पुन्हा ५०० कोटींचा निधी

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २,४५० वर स्थिर आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स किमती ०.२ टक्क्यांनी घसरून रु. २,४६६ वर आल्या आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. २,४६६ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.९ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.

हळद

NCDEX मध्ये या महिन्यात हळदीसाठी ऑक्टोबर व डिसेंबर डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या ०.६ टक्क्यांनी घसरून सप्ताहात रु. १४,१५४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी घसरून रु. १३,८१९ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्युचर्स किमती ०.९ टक्क्यांनी घसरून रु. १३,७०२ वर आल्या आहेत. एप्रिल किमती रु. १४,११० वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.१ टक्क्यांनी अधिक आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ३.९ टक्क्यांनी घसरून रु. ७,४०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा २.७ टक्क्यांनी घसरून रु. ७,२०० वर आल्या आहेत. नवीन हंगामासाठी हमीभाव रु. ५,६५० जाहीर झाला आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,९२५ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. किमती कमी होत आहेत.

Soybean and Tur
Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,६४६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात ८.२ टक्क्यांनी घसरून रु. ८,९९४ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ८,७०८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. नवीन पिकाची आवक जानेवारी अखेर सुरू होईल; पण साठ्यातील आवक वाढती आहे.

कांदा

कांद्याची किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात सरासरी रु. ४,३३८ होती; या सप्ताहात ती रु. ४,२१७ वर आली आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४,७५० वर आली होती. या सप्ताहात ती घसरून रु. ४,००० वर आली आहे. आवकेत उतरता कल आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com