Solapur News: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सीताफळाला चांगला उठाव मिळत असून, मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे दरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून सीताफळाच्या दरात तेजी असून, प्रति क्विंटलचा सर्वाधिक दर थेट ७५०० रुपयांवर पोचला आहे..सोलापूर बाजार समितीत डाळिंब, केळी, पेरू या फळांबरोबर सीताफळाची आवकही चांगली असते. सीताफळाची आवक स्थानिक भागातूनच सर्वाधिक होते, काही आवक शेजारील धाराशिव, लातूर आणि सांगली भागांतूनही होते. यंदा पाऊसमान चांगला झाला, पण कीड, रोगांचा प्रादुर्भावही वाढला..Custard Apple Crop Management : सीताफळ काळे पडण्यामागील कारणे, उपाययोजना .पण यातूनही तरलेल्या सीताफळाने सध्या बाजारावर तेजीचे वातावरण निर्माण केले आहे. सध्या बाजारात रोज केवळ ४० ते ५० क्विंटल एवढीच आवक होते आहे. मागणीच्या अगदीच १० ते २० टक्क्यांपर्यंतच आवक होते आहे. पण सध्या अन्य फळांबरोबर सीताफळालाही उठाव मिळत असताना, केवळ कमी आवकेमुळे दर मात्र चांगलेच वाढले आहेत..Custard Apple Production: सेंद्रिय खतामुळे सीताफळाचे भरघोस उत्पादन.सध्या सीताफळाला प्रति क्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक ७५०० रुपये इतका दर आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत प्रति क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार वगळता दर मात्र काहीसे टिकून आहेत. येत्या काही दिवसात त्याच्या आवकेवरच त्याचा दर अवलंबून असणार आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले..माझी दीड एकर बाळानगरी वाणाची सीताफळाची बाग आहे. गेल्या ८-१० वर्षांपासून मी सीताफळ करतो आहे. सध्या सीताफळाला चांगला दर मिळतो आहे. मागच्या आठवड्यात मला प्रति किलोला ११५ रुपयांपर्यंतचा दर मिळाला. आवक कमी असल्याने दर आणखी वाढतील, असे वाटते.सदाशिव गायकवाड, कोंडी, ता. उत्तर सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.