Ahilyanagar News: अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारासह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या या कांद्याची काढणी जोरात सुरू असल्याने आवक वाढत असल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी (ता. २२) येथे विक्रमी १ लाख ८८ हजार ३३६ गोण्यांची आवक झाली. दर मात्र गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहेत..नेप्ती उपबाजार समितीत अहिल्यानगर, पारनेर, श्रीगोंदे, नेवासे, राहुरी आदी तालुक्यांतून कांद्याची आवक झाली. नेप्ती उपबाजारमध्ये सोमवारी (ता. १९) कांद्याच्या १ लाख ७२ हजार ७८१ कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला कमीत कमी २००, मध्यम कांद्याला १०५० व जास्तीत जास्त १८०० रुपयांचा प्रति क्विंटलला भाव मिळाला..Onion Market: जानेवारी महिन्यात विकला ६७२३ गाड्या कांदा.सोमवारच्या तुलनेत आज कांद्याच्या गोण्यांची आवक वाढूनही भावात १०० रुपयांनी वाढ झालेली आहे. कांद्याला कमीत कमी २००, मध्यम कांद्याला ११०, तर जास्तीत जास्त १९०० रुपयांचा भाव मिळाला. घोडेगाव उपबाजार समितीत बुधवारी (ता. २१) कांद्याचे लिलाव झाले..Summer Onion Cultivation: उन्हाळ कांदा लागवडीसाठी ‘मल्चिंग पेपर’ पॅटर्न.एक नंबर कांद्याला १७०० रुपयांचा प्रति क्विंटलला भाव मिळाला. नेवासे, गंगापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, राहुरी आदी तालुक्यांतून कांद्याची ४८ हजार ४४७ गोण्यांची आवक झाली. सोमवारच्या (ता. १९) लिलावाइतकाच गुरुवारीही एक नंबर कांद्याला भाव मिळाला. मात्र मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याच्या दोन हजार गोण्यांची आवक कमी झाली होती..कांद्याला मिळत असलेला दर (प्रती क्विंटल)एक नंबर कांदा : १५०० ते १९००दोन नंबर कांदा : १००० ते १५००तीन नंबर कांदा : ५०० ते १०००चार नंबर कांदा : २०० ते ५००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.