Nashik News: कांद्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मात्र आता बाजार समितीचा खानगावनजीक हा उपबाजार आवार भाजीपाल्यासाठी ओळखला जाऊ लागला. येथे जवळपास २० हून अधिक प्रकारच्या भाजीपाल्याची आवक होत आहे. त्यामध्ये मिरचीची आवक सर्वाधिक होत आहे. या आवारात एका दिवसात १६,८८९ पिशवी आवक झाल्याने विक्रम झाला आहे..लासलगाव बाजार समितीने कार्यक्षेत्रातील खानगाव नजिक, खडक माळेगाव, कोटमगाव, सारोळे खु., वनसगाव, उगाव, शिवडी, खेडे व परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीच्या सोईसाठी खानगावनजिक येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या जागेत गेल्या ५ वर्षांपासून मिरची, इतर फळे व भाजीपाला या शेतीमालाचे लिलाव सुरू केलेले आहेत. दर वर्षी या शेतीमाल लिलावास व्यापारी व शेतकरी बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दिवसेंदिवस सदर खरेदी-विक्री केंद्रावर मिरची, इतर फळे व भाजीपाला शेतीमाल खरेदी-विक्रीची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे..Chilli Farming: दर घटल्याने मौदा तालुक्यात मिरची लागवडीचे क्षेत्र घटले .सोमवारी (ता.१८) बाजार समिती उपबाजार आवारामध्ये भाजीपाल्याची आवक तब्बल २८,२४१ पिशवी (एका पिशवी : ११ ते १५ किलो) इतकी विक्रमी आवक झाली. मागील वर्षी २६,००० पिशव्यांमध्ये झालेली भाजीपाला आवक विक्रमी ठरली होती. त्यामुळे मागील विक्रम मोडीत निघाला. यामध्ये मिरचीची विक्रमी आवक १६,८८९ पिशवी झाली. मागील ती सर्वाधिक १२,६७० पिशवी होती. त्याकुळे आवकेचा विक्रम यंदा मोडला आहे. मिरचीला प्रतिक्विंटल किमान २,५०० कमाल ५,३०० व सरासरी ४,५०० रुपये दर मिळत आहेत..Chilli Cultivation: नंदुरबारात मिरची लागवडीस गती.बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या निफाड तालुक्यासह चांदवड, येवला व कोपरगाव येथूनही शेतीमाल विक्रीसाठी येतो. त्यामुळे दिवसेंदिवस या भाजीपाला बाजाराची व्याप्ती वाढत आहे. लासलगाव–पिंपळगाव बसवंत रस्त्यावर खानगाव बाजारामध्ये प्रामुख्याने हिरव्या मिरचीमध्ये लवंगी, पिकॅडोर व ढोबळी अशा मिरचीची मोठी आवक होत आहे. हा नव्याने तयार झालेला उपबाजार आवार भाजीपाला आवकेसाठी जिल्ह्यात ओळखला जाऊ लागला आहे. पूर्वी तात्पुरत्या स्वरूपाचे द्राक्षमणी लिलाव केले जायचे. आता येथे वर्षभर भाजीपाला लिलाव सुरू आहेत. मिरचीसह काकडी, घेवडा, भोपळा, गिलके, टोमॅटो, वांगी, भेंडी, कोबी, फ्लॉवर, वाटाणा, पेरू, लसूण, अद्रक, मेथी, कोथिंबीर, मधुमका, लिंबू, कांदा आवक होत आहे..झालेली मिरचीची विक्रमी आवक (ता.१८)मिरची प्रकार आवक (पिशवी)बलराम मिरची ६,३३६बुलेट मिरची ५,१२५ढोबळी मिरची २,४७६हिरवी लवंगी मिरची १६६१ज्वेलरी मिरची १,३००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.