Monetary Policy: पश्चिम आशियातील संकट, वाढती महागाई आणि मॉन्सूनवर ‘एल निनो’चे सावट आदी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपोदरात कोणताही बदल न करता तो ५.२५ टक्के इतका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी (ता. ५) जाहीर केले. या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा हप्ता वाढणार नसून तो स्थिर राहणार आहे. .आरबीआयने २०२५ वर्षात पॉलिसी रेपोदरात एकूण १२५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती. त्यानंतर सलग तिसऱ्यांदा रेपो दर ‘जैसे थे’ ठेवला आहे. शेती क्षेत्र आणि महागाई या बाबतही ‘आरबीआय’ने त्यांचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदाच्या मॉन्सूनची कामगिरी ही भारताचे शेती क्षेत्र आणि महागाईचा कल कसा राहील, या दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. कमी पावसाचा शेती उत्पादन आणि अन्नधान्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ‘पतधोरण समिती’च्या निर्णयाची माहिती देताना व्यक्त केली..RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर.महागाई दर आरबीआयच्या लक्ष्यापेक्षा कमी असतानाही, अन्नधान्य महागाईचा पुढील कल अनिश्चित स्वरूपाचा राहील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. आरबीआयने आर्थिक वर्षातील उर्वरित कालावधीसाठी महागाईचा दर ५.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मॉन्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आणि ‘एल निनो’ची शक्यता आदींमुळे अनिश्चितता निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे..RBI Grievance Redressal: ‘आरबीआय’ची बँकिंग तक्रार निवारण सुविधा : केदार.कमी पावसाचा थेट फटका पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला बसू शकतो. परिणामी प्रमुख अन्नधान्यांची पुरवठा साखळी विस्कळीत होऊन किमतींवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. ‘‘यंदा मॉन्सूनवर ‘एल निनो’चे सावट आहे. यामुळे कमी पावसाचा अंदाज असल्याने अन्नधान्याच्या परिस्थितीबाबतचा पुढील कल अद्याप अनिश्चित आहे. एकूणच कमी पावसाचा शेती उत्पादनांवर परिणाम होईल,’’ असे मल्होत्रा म्हणाले..जीडीपी वाढ कमीदरम्यान, आरबीआयने पश्चिम आशियातील संघर्षामुळे तेलाच्या दरात झालेली वाढ आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा संदर्भ देत, आर्थिक वर्ष २०२७ साठीचा आर्थिक विकास दर (जीडीपी) वाढीचा अंदाज ६.९ टक्क्यांवरून ६.६ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे..हवामानाशी संबंधित जोखीम चिंतेची बाबहवामानाशी संबंधित जोखीम ही एक प्रमुख चिंतेची बाब आहे. अनुकूल पावसामुळे अन्नधान्यांच्या किमती स्थिर राहण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार मिळण्यास मदत होऊ शकते. तर कमी पावसामुळे पुढील काही महिन्यांत महागाईची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत..‘तटस्थ’ धोरणमहागाईच्या वाढत्या जोखमी असूनही, चलनविषयक धोरण समितीने आपले धोरण ‘न्यूट्रल’ (तटस्थ) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. समिती परिस्थितीवर लक्ष ठेवून डेटाच्या आधारे पुढील पाऊल उचलेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.