Market Demand: देशांतर्गत बाजारपेठेत बेदाण्याला चांगली मागणी आणि उठाव असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर स्थिर आहेत. येत्या पंधरवड्यात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून बेदाणा खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे. आजअखेर अंदाजे ८० हजार ते १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली असून, पुढील काळातही दर टिकून राहतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..राज्यात २०२४-२५ मध्ये १ लाख ७० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. तर यंदा (२०२५-२६) सुमारे दोन लाख टन बेदाण्याचे उत्पादन झाले असून, त्यातील सर्वाधिक उत्पादन सांगली जिल्ह्यात झाले आहे. गत वर्षी मे महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीचा द्राक्ष पिकाला फटका बसल्याने बेदाणा उत्पादन घटेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, द्राक्ष हंगाम सुरू झाल्यानंतर पश्चिम आशियातील युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला. .Raisin Export: राज्यातून बेदाणा निर्यातीत घट; उत्पादन घटल्याने देशांतर्गत बाजारपेठेत चांगले दर.त्याच वेळी देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाचे दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्रीऐवजी बेदाणा निर्मितीला प्राधान्य दिले. त्यामुळे यंदा बेदाणा उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली. दर वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बेदाण्याचा हंगाम सुरू होतो. मात्र अतिवृष्टीमुळे यंदा हंगाम सुमारे २५ दिवस उशिराने सुरू झाला. सुरुवातीचे पंधरा-वीस दिवस द्राक्षाचे उत्पादन कमी असल्याने बेदाणा निर्मितीचा वेग मंद होता. त्यानंतर हंगामाला गती मिळाली. हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाण्याचे दर समाधानकारक राहिले. मे-जूनमध्ये दरात काहीशी घसरण झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा दरात सुधारणा झाली..Green Raisin Prices: हिरवा बेदाणा दरात सुधारणा.सध्या बाजारात दर्जानुसार बेदाण्याला चांगली मागणी आहे. येत्या पंधरा-वीस दिवसांत देशभरात सण-उत्सव सुरू होत असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीचे नियोजन सुरू केले आहे. दर्जेदार बेदाण्याला प्रतिकिलो २८० ते ४०० रुपये दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर चांगले असल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. एकूण दोन लाख टन उत्पादनापैकी आतापर्यंत ८० हजार ते १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली असून, सध्या १ लाख ते १ लाख २० हजार टन बेदाणा शिल्लक आहे..बेदाण्याचे प्रति किलो दर (रुपये)हिरवा २७० ते ४००पिवळा २८० ते ३५०काळा ७० ते १५०.देशांतर्गत बाजारात बेदाण्याला चांगली मागणी असल्याने दर देखील समाधानकारक आहेत. आता सण-उत्सवांचा हंगाम सुरू होत असल्याने व्यापाऱ्यांकडून खरेदीला वेग येईल. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.