New Delhi News: भारत-अमेरिका व्यापार करारावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी (ता.११) लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘‘अमेरिकेने अटी घालून, भारतावर लादलेले टॅरिफ ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत आणले. त्याचवेळी भारताकडून अमेरिकेवर लागू करण्यात येणारे टॅरिफ मात्र शून्यापर्यंत आणण्याचे काम भारताकडून मंजूर करून घेतले. .तसेच भारताला रशियाकडून तेल खरेदी करू नका असे सांगितले. तुम्ही देश विकला आहे. तुम्हाला भारत विकल्याची लाज वाटत नाही का? तुम्ही भारतमातेला विकले. देशातल्या शेतकऱ्याला विकले,’’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला..India-US Trade Deal : द्विपक्षीय व्यापार कराराबाबत 'व्हाईट हाऊस'चं पत्रक; करारातले मुद्दे केले स्पष्ट.केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका करारात देशातील शेतकऱ्यांचे हित पायदळी तुडवल्याचा गंभीर आरोप केला. अमेरिकेला इतर देशांसह युरोप, आफ्रिका, चीनच्या तुलनेत भारताचा डेटा ही बाब खूप महत्त्वाची आहे. महासत्ता म्हणून स्थान कायम राखायचे असेल तर अमेरिकेला डॉलर वाचवणे महत्त्वाचे असल्याचे गांधी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले..‘‘तुम्ही यांत्रिकीकृत अमेरिकेच्या शेतीसाठी देशाचे दार खुले केले आहे. तुम्ही आमच्या गरीब शेतकऱ्यांना चिरडून टाकण्यासाठी देशाची बाजारपेठ खुली केली आहे, ही लज्जास्पद बाब आहे. ही पूर्णपणे शरणागती आहे. कारण ही केवळ पंतप्रधानांची शरणागती नव्हे तर ती भारतीयांची आहे. त्यांनी १.५ अब्ज भारतीयांना अमेरिकेपुढे झुकवले आहे. कारण त्यांना भाजपच्या आर्थिक रचनेचे रक्षण करायचे आहे, ज्यावर अमेरिकेत खटला सुरू आहे,’’ असा गौप्यस्फोट त्यांनी केला..India US Trade Deal: संवेदनशील पिकांना संरक्षणासह १० वर्षांपर्यंत शुल्क निर्मूलन.‘‘मला माहीत आहे की सामान्य परिस्थितीत पंतप्रधान भारताला विकू देणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी देशाला का विकले? कारण ते त्यांच्यावर दबाव आणत आहेत. आम्हाला पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती दिसते. ते नजरेला नजर भिडवू शकत नाहीत. त्यातील एक बाब म्हणजे एपस्टीन फाईल. अद्याप त्यातील ३० लाख फायली बंद आहेत,’’ असा धक्कादायक दावा गांधी यांनी केला..‘ही संपूर्ण शरणागती’‘‘टॅरिफच्या बाबतीत आपण पडती भूमिका घेतली. आपल्या माहितीचा मोठा साठा आपण अमेरिकेसाठी खुला केला. आपल्या शेतकऱ्यांना अमेरिकेतील बलाढ्य यंत्राधारित शेतीच्या भरवश्यावर सोडून देण्यात आले. आपले कापड उद्योग संपुष्टात येतील. बांगलादेश आपल्यावर मात करेल. आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. आपल्याला ज्यांच्याकडून तेल खरेदी करायचे आहे, त्यांच्याकडून खरेदी करता येणार नाही. मला वाटत नाही की कोणताही पंतप्रधान असे काही करेल. ही संपूर्ण शरणागती आहे,’’ अशी टीका राहुल गांधींनी या वेळी पंतप्रधानांवर केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.