Pune News: महाशिवरात्री निमित्त विशेष मागणी असलेल्या कवठ आणि रताळ्याची पुणे बाजार समितीमध्ये मोठी आवक झाली होती. या वेळी कवठाची आवक पुणे जिल्ह्यातील जेजुरी, बारामती, इंदापूर दौंडसह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यांतून झाली होती. तर रताळ्याची आवक सातारा, कराड, सोलापूर, पंढरपूर भागांतून झाली होती. या वेळी कवठाला शेकड्याला ५०० ते १ हजार, तर रताळ्याला ३५ ते ४० रुपये प्रति किलोला दर होता. .रताळ्याची आवक आणि दराबाबत ज्येष्ठ अडतदार अमोल घुले यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘दर वर्षी प्रमाणे महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुणे बाजार समितीमध्ये बुधवारपासून (ता.११) आवकेला प्रारंभ झाला. ही आवक प्रामुख्याने सातारा, कराड, सोलापूर, पंढरपूर भागांतून झाली होती. गेल्या चार-पाच दिवसांत सुमारे पाच हजार गोणी आवक झाली होती. या वेळी कराड रतळ्याला किलोला ३५ ते ४० रुपये, तर पंढरपूर भागातील रताळ्याला किलोला २० ते २५ रुपये दर होते..Wheat Export: केंद्राकडून २५ लाख टन गहू निर्यातीला मंजुरी; साखरेचा कोटाही वाढवला निर्यात होणार.तर कवठाच्या आवकेबाबत शेतकरी गणेश बंड (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) म्हणाले, ‘‘आमच्याकडे कवठाची ५ झाडे असून, दर वर्षी आमची आणि शेजारील शेतकऱ्यांच्या १०-१२ झाडांची अशी कवठे विक्रीसाठी आणत असतो. या वर्षी ८० गोणी विक्रीस आणली होती. तर दर शेकड्याला ५०० ते १ हजार रुपये एवढा होता. कवठांची झाडे दिवसेंदिवस कमी होत असून, उत्पादन घटत आहे. नव्याने कोणी कवठे लावत नाहीत आणि लावली तरी त्याला फळ लागण्याचा कालावधी १५ ते २० वर्षांचा असल्याने भविष्यात कवठाचे उत्पादन घटणार असल्याचे बंड यांनी सांगितले..Agrowon Podcast: कांदा भाव दबावात; सोयाबीनमध्ये सुधारणा, कापसावर दबाव, केळी भाव टिकून तर काकडीची आवक मंदावली.यंदा पाऊस लांबल्याने शेतात ओलावा चांगला होता. यामुळे कमी पाण्यावर चांगली उत्पादन मिळाले. आणि दर देखील चांगला मिळाल्याने हंगाम चांगला झाला.महादेव शिंदे, शेतकरी, पंढरपूर, जि. सोलापूर.मी या वर्षी ३० पोती आणली होती. शेकड्याला ३०० ते ८०० रुपये दर मिळाला. वाढत्या महामार्गामुळे रस्त्याच्या लगत असलेली कवठाची झाडे तुटत चालली आहे. तर जेजुरी परिसरातील मोठ्या प्रमाणावर जमिनी विक्री होत असल्याने जुनी ४०-५० वर्षांची कवठाची झाडे तुटत आहेत. त्यामुळे उत्पादन घटत आहे.तुकाराम जगताप, रा. कोथळ, जेजुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.