Wardha News: कापसावरील ११ टक्के आयात शुल्काची पुन्हा अंमलबजावणी होताच खुल्या बाजारात कापसाच्या दरात सकारात्मक सुधारणा दिसून येत आहे. विदर्भातील कापूस व्यवहाराचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगणघाट बाजार समितीत ‘एफएक्यू’ दर्जाच्या कापसाचे दर ८०४५ रुपये प्रति क्विंटल इतके पोहोचले असून, दुय्यम प्रतीच्या कापसाला ७५५० रुपये दर मिळत आहे. दीर्घकाळ दबावाखाली असलेल्या कापूस बाजारासाठी ही स्थिती दिलासादायक मानली जात आहे..केंद्र सरकारने चालू हंगामासाठी कापसाला ८११० रुपयांचा किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. मात्र यापूर्वी कापसावरील आयात शुल्क हटविल्यामुळे देशांतर्गत बाजारात परदेशी कापसाचा शिरकाव वाढला आणि त्याचा थेट फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसला. ३१ डिसेंबरपर्यंत आयात शुल्क सवलत लागू होती, मात्र त्यानंतर या निर्णयाला मुदतवाढ न मिळाल्याने आता पुन्हा ११ टक्के आयात शुल्क आकारले जात आहे. याच निर्णयाचा परिणाम म्हणून बाजारात कापूस दरात सुधारणा अनुभवास येत आहे..Cotton Price: खुल्या बाजारातील कापूसदरात सुधारणा.सध्या हिंगणघाट बाजार समितीत दररोज सरासरी ३१० गाड्या कापसाची आवक होत असून, खुल्या बाजारात ७५५० ते ८०४५ रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. याच बाजारात सीसीआयकडे (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मात्र केवळ ५० गाड्यांची आवक होत असून, तेथे कापसाला ७६९० ते ८०१० रुपये दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली..Cotton Rate: भारताच्या सुताचा मोठा ग्राहक बांगलादेश काय निर्णय घेणार?.पुढील काळात दर ८५०० पर्यंत जाण्याची शक्यताकापूस विपणन विषयाचे अभ्यासक गोविंद वैराळे यांनी दरवाढीबाबत आशावादी चित्र मांडले आहे. कापसावर पुन्हा आयात शुल्क लागू झाल्याने कापूस दरात सुधारणा झाली आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात कापसाचे दर ८५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. या दरात कापूस विकणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले..पोंगलनंतर धोरणात्मक बदल शक्य १४ ते १७ जानेवारी या कालावधीत दक्षिण भारतात, विशेषतः तमिळनाडूमध्ये पोंगल सण साजरा केला जातो. या सणानंतर त्या भागात कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना वेग येतो. त्यामुळे पुढील धोरणात्मक बदलांची शक्यता नाकारता येत नाही. पोंगलनंतर दक्षिण भारतातील प्रक्रिया उद्योजकांनी केंद्र सरकारवर दबाव टाकल्यास पुन्हा आयात शुल्क सवलतीबाबत निर्णय होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी १४ जानेवारीपर्यंत ‘वेट अँड वॉच’ धोरण स्वीकारणे गरजेचे आहे.टी. सी. चांभारे, सचिव, हिंगणघाट बाजार समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.