Sangli News: अतिवृष्टी, बदलते हवामान आणि रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. परिणामी, आवक कमी होऊन देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाला चांगले दर आहेत. नैसर्गिक आपत्तींमुळे डाळिंब उत्पादकांसमोर मोठी आव्हाने उभी राहिल्यामुळे देशातून डाळिंबाची निर्यात घटण्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे. देशातून एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत ४६ हजार १७६ टन डाळिंबाची निर्यात झाली आहे..देशातून प्रामुख्याने अरब अमिराती, बांगलादेश, नेपाळ, नेदरलॅंड, सौदी अरेबिया, श्रीलंका यासह अन्य देशांत डाळिंबाची निर्यात होते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांत डाळिंब पिकाचा विस्तार झाला आहे. महाराष्ट्रात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र असून सर्वाधिक निर्यातही होते..Pomegranate Price: दरामुळे वाढली डाळिंबाची गोडी.देशभरातील डाळिंब उत्पादक राज्यांत वर्षांत अतिवृष्टी, बदलते वातावरण, तेलकट डाग, मर रोगाचा प्रादुर्भाव डाळिंब पिकावर झाला होता. तरीही शेतकरी काटेकोर व्यवस्थापन करत मृग, हस्त, आंबिया बहर साधतो आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून देशांतर्गत बाजारपेठेतही डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत..देशातून एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ४६ हजार १७६ टन डाळिंबाची निर्यात झाली असून त्यापोटी ४४८ कोटी २२ लाखांची उलाढाल झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातून १२ हजार ०९६ टन डाळिंब सातासमुद्रापार पोहोचले आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशांतर्गत बाजारपेठेत दर्जेदार डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत. सध्या डाळिंबाला प्रति किलोस १७५ ते २०० रुपये दर आहेत. गेल्या महिन्यापासून डाळिंबाचे दर स्थिर असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाची विक्री होऊ लागली आहे. बाजारात डाळिंबाला मागणी आहे, पण त्याचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे देशातून डाळिंबाची निर्यात घटेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे..Pomegranate Export: डाळिंब निर्यातीला प्रोत्साहन देणार : पणनमंत्री रावल .गतवर्षी देशातून ७२ हजार ०१६ टन डाळिंबाच्या निर्यातीतून तब्बल ७१८ कोटींची उलाढाल झाली. त्या वेळी राज्यातून १९ हजार ६७६ टन इतकी डाळिंबाची निर्यात झाली होती. तर २०२३-२४ मध्ये देशातून ७२ हजार १० टन डाळिंबाची निर्यात झाली होती. २०२१-२२ मध्ये देशातून ९९ हजार ०४२ टन डाळिंबाची निर्यात झाली होती. चार वर्षांपूर्वी डाळिंबावर ‘पीन होल बोअर’चा मोठा प्रादुर्भाव झाल्याने डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. २०२२-२३ मध्ये देशातून ६२ हजार २७९ टन डाळिंबाची निर्यात झाली होती. अर्थात २०२१-२२ च्या तुलनेत २२-२३ मध्ये ३६ हजार २७३ टनांनी डाळिंबाची निर्यात घटली होती..यंदा डाळिंबाला मागणी आहे, पण उत्पादन कमी असल्याने पुरवठा कमी आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत चांगले दर मिळत आहे. यामुळे याचा परिणाम निर्यातीवर होत आहे. विजय मरगळे, डाळिंब उत्पादक शेतकरी, तडवळे, जि. सांगली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.