Pimpalgaon Baswant APMC: दिवाळीनंतर पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात खरीप लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. १२) बाजार समितीचे सभापती आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करून लाल पोळ कांद्याच्या हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. .पहिल्याच दिवशी कांद्याला प्रति क्विंटल किमान २८०० रुपये, कमाल ५२२२ रुपये, तर सरासरी ४२०० रुपये असा दर मिळाला..Onion Farming: कांदेबाग लागवडीचे योग्य व्यवस्थापन.आशिया खंडातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये पिंपळगाव बसवंत बाजार समितीची ओळख आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रासह परिसरातील अन्य भागांतूनही येथे मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते. बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना रोखीने अदा केले जात असल्याचे प्रशासनाने सांगितले..Kharif Onion Price: नव्या खरीप कांद्याच्या आवकेने दरावर दबाव.या वेळी संचालक सोहनशेठ भंडारी, शंकरलाल ठक्कर, नारायण पोटे, अतुलशेठ शहा, सुरेशशेठ पारख, महावीर भंडारी, हितेश ठक्कर, अनुप थोरात, भरत ठक्कर, रवींद्र ठक्कर, अनिल जाधव, प्रकाश ठक्कर, चेतन बोरा, भाऊसाहेब पडोळ, केतन पुरकर, सुनील थोरात यांच्यासह खरेदीदार व व्यापारी उपस्थित होते..शेतकऱ्यांनी कांद्याच्या विक्रीसाठी पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या जोपुळ रस्त्यावरील मुख्य बाजार आवारात कांदा आणावा, असे आवाहन सभापती बनकर, उपसभापती शिरीष गडाख, संचालक मंडळ आणि सचिव एस. डी. जाधव यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.