Nagpur News: मृगबहारातील संत्र्यांची कळमना बाजारात रोज सरासरी ४० क्विंटलची आवक होत आहे. दरम्यान, खरेदीदारांची मागणी आणि उपलब्धता यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. परिणामी, चांगल्या प्रतीच्या संत्र्यांना ७२ हजार रुपये आणि सामान्य दर्जाच्या संत्र्यांनाही ५२ हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे.महत्त्वाचे म्हणजे, बाजारात ज्या प्रमाणात खरेदीदार उभे आहेत, त्या तुलनेत फळांचा पुरवठा अत्यंत मर्यादित आहे. केरळसह दक्षिण भारतातून पोंगलच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या दर तेजीत असल्याचे नव अनंत शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक राकेश मानकर यांनी सांगितले. फळांचा लॉट बाजारात उतरल्याक्षणी बोली लागत आहे..Orange Farming: करंजी परिसरातील शेतकऱ्यांना संत्र्यातून दिलासा.संत्रा बाजारात दर कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नव्या आवकेची गरज असते; मात्र सध्या ती परिस्थितीच नाही. बागांमध्ये उपलब्ध फळे मर्यादित असून जे काही उत्पादन आहे ते आधीच व्यापाऱ्यांच्या नजरेत आहे. त्यामुळे बाजारात ‘ओव्हरसप्लाय’ होण्याची शक्यता नसल्याने भाव दबावाखाली येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले..कळमना बाजारातील व्यवहार पाहता हा संत्रा हंगाम पूर्णपणे उच्च दर संरचनेत चालू आहे. फळांचा प्रवाह कमी आणि खरेदी सातत्याने सुरू असल्याने दर सध्या स्थिर उच्च पातळीवर टिकून आहेत. बाजार यंत्रणेत अशी स्थिती असताना दरात घसरण होण्याची कोणतीही जागा दिसत नसून, मृग बहार संत्र्यांचा हा टप्पा उत्पादकांच्या बाजूने असलेला ठाम बाजार म्हणून ओळखला जात आहे..Orange Crop Insurance: संत्रा उत्पादकांना १७ कोटींचा विमा परतावा.तळाचा दरही मजबूतबाजारात सध्या तीन दरस्तर स्पष्ट झाले आहेत. मोठे, चांगल्या रंगाचे व टिकाऊ फळ असलेल्या लॉट्सना ७० ते ७२ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत आहे. मध्यम दर्जाच्या फळांचे दर ६० ते ६५ हजार रुपये असून, अगदी खालच्या दर्जालाही ५२ ते ५८ हजार रुपयांपेक्षा कमी दर मिळत नाही. म्हणजेच बाजाराचा तळाचा दरही मजबूत आहे..वातावरणातील बदलामुळे यंदा सुरुवातीच्या काळात मृग बहार गळाला. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी व्यवस्थापनाच्या बळावर दुसऱ्यांदा हा बहार घेण्यात यश मिळविले. अशाच शेतकऱ्यांच्या बागांमधील फळांची आवक बाजारात होत आहे.राकेश मानकर, संचालक, नवअनंत शेतकरी उत्पादक कंपनी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.