New Delhi News: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क १९ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी हटविण्याचा अंतरिम आदेश जारी केला आहे. यामुळे परदेशी कापूस भारतात येऊन देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने हा आदेश रद्द करावा, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली असून, याविरुद्ध देशभरात आंदोलनाची घोषणाही केली आहे. या मुद्द्यावर १७-१८ सप्टेंबरला संयुक्त किसान मोर्चाचे शिष्टमंडळ विदर्भात कापूस उत्पादकांच्या भेटीसाठी जाणार आहे. .संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत, हन्नन मौला, राजन क्षीरसागर आणि प्रेमसिंग अहलावत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कापूस आयात शुल्क हटविण्याच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. या आयातीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला..CCI Cotton Procurement: कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणी.तर माजी खासदार व अखिल भारतीय किसान सभेचे नेते हन्नन मौला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करताना अमेरिकेच्या शुल्क आकारणीच्या दबावाखाली सरकारने गुडघे टेकले, असा आरोप केला. केंद्र सरकारच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, हरियाना, पंजाब अशा १२ राज्यांमध्ये संयुक्त किसान मोर्चातर्फे आंदोलन केले जाईल. तसेच ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या अंतरिम आदेशाची होळी करण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले..Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाला लगडली बोंडं .पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले शेतकरी नेते पी. कृष्णप्रसाद यांनी सांगितले, की देशातील ६० लाख शेतकऱ्यांचा कापूस उत्पादनात सहभाग आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी ३६ टक्के उत्पादन भारतात होते. आधीच सर्व शेतकऱ्यांना एमएसपी मिळत नाही. असे असताना परदेशी दबावाखाली कापूस क्षेत्र आयातीसाठी खुले करण्यात आले आहे. भविष्यात दुग्धोत्पादन क्षेत्रही परदेशी व्यापाऱ्यांसाठी खुले होऊ शकते, असा इशारा कृष्णप्रसाद यांनी दिला..महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नुकसानपत्रकार परिषदेत उपस्थित असलेले शेतकरी नेते राजन क्षीरसागर म्हणाले,‘‘महाराष्ट्रात कापसाचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च ७,१४० रुपये आहे. तर जाहीर करण्यात आलेली एमएसपी ७,७१० रुपये अशी तुटपुंजी आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपयांचे नुकसान झेलावे लागत आहे. सद्यःस्थितीत महाराष्ट्रात कापसाचा दर प्रतिक्विंटल ६,०२० रुपये असून ११ टक्के आयात शुल्क हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात कापसाचे दर ५०० रुपयांनी खाली आले आहेत. भविष्यात त्यात आणखी घसरण होऊ शकते.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.