Nashik News : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीने ग्राहकांसाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन नोडल एजन्सीच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यांपूर्वी १४ ते १६ रुपये म्हणजेच उत्पादन खर्चाच्या खाली कांद्याची खरेदी उरकली. .खरेदीच्या पोटी गणेशोत्सवापर्यंत रडतखडत ७५ टक्के शेतकऱ्यांची देयके अदा केली. मात्र आता खरेदी होऊन तीन महिने उलटले तरीही २५ टक्के देयकांची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे दिवाळीला ग्राहक व्यवहार विभागाकडून कष्टाच्या पैशांसाठी कोंडी केली जात आहे. केंद्राच्या योजनेत शेतीमाल विकूनही पैसे मिळत नसल्याने कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे..Onion Farmer Support: कांद्याच्या भविष्यासाठी प्रोत्साहन द्या, बियाणे निर्यातीवर बंदी घाला.‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन्ही संस्थांनी जुलै महिन्यात प्रत्येकी १.५ लाख टन रब्बी उन्हाळ कांद्याची खरेदी पूर्ण केली. यामध्ये निर्यातक्षम गुणवत्तेचा कांदा दिला. त्याची ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकृत ‘सप्लाय व्हॅलिड’ या पोर्टलवर देखील नोंद आहे. मात्र असे असताना केंद्राला प्रत्यक्ष खरेदी व साठ्याबाबत संशय असल्याने आतापर्यंत केंद्राच्या विविध विभागांची पाच ते सहा पथके जिल्हा दौऱ्यावर येऊन गेली. याबाबत अहवाल सादर झाला. तरीही शेतकऱ्यांना पैशांसाठी वाट पहावी लागत आहे..शेतकऱ्यांचा संयम सुटतोय‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’कडे विक्री केलेल्या कांद्याचे पैसे मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. खरेदीपश्चात ७२ तासांत पैसे देण्याचे सांगितले असताना दोन महिने उशिराने शेतकऱ्यांचे एकूण देयकांच्या ७५ टक्के पैसे अदा केले.मात्र अद्याप शेतकऱ्यांची २५ टक्के देयके रोखलेली आहेत. ही रक्कम जवळपास १०० कोटींवर असल्याचे समजते. अगोदरच अतिवृष्टीचे संकट, त्यात आता सणासुदीच्या तोंडावर आर्थिक कोंडी झाली आहे. .Onion Rate : लासलगावात कांदा सरासरी १४०० रुपये क्विंटल.त्यामुळे शेतकरी आता कांदा विक्री केलेल्या खरेदीदार संस्थांकडे तगादा लावत आहेत. त्यामुळे या दोन्ही संस्थांसाठी कांदा खरेदी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जात आहेत..ग्राहकांसाठी तरतूद , तर शेतकऱ्यांची अडचणकांदा पिकासाठी केलेला उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. दुसरीकडे वातावरणीय बदलांमुळे साठवलेल्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर सड होत आहे. अशा परिस्थितीत केंद्राने खरेदी केलेल्या कांद्यापैकी ३० ते ३५ टक्के बफर साठ्याचा ग्राहकांसाठी देशाच्या विविध भागांत पुरवठादेखील केला. मात्र खरेदीला तीन महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.