Pune News: गेल्या आठवड्यापासून गणेशोत्सव सुरू झाला आहे. यामध्ये पूजा आणि तोरणासाठी नारळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे परिसरातच उत्सव काळात दररोज दीड ते दोन लाख नारळांची विक्री होत आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत आकारानुसार ४० ते ५० रुपयांवर पोहोचली आहे..मागील काही महिन्यांत अनियमित हवामानामुळे नारळाच्या उत्पादनात देशभरात तब्बल २५ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे दरात मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याने ग्राहकांना नारळालाही जादा पैसे मोजावे लागत आहेत. गुलटेकडी मार्केट यार्ड येथे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू येथून नारळाची आवक होते..Coconut Farming : कोकणातील नारळाची शेती मराठवाड्यात .उत्पन्न कमी असल्याने नारळांचा पुरवठाही कमी होत आहे. त्यातच किरकोळ विक्रेत्यांकडून २५ ते ३० टक्क्यांनी मागणी वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दरांमध्ये तेजी आहे. दिवाळीपर्यंत मागणी कायम राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.गणेशोत्सवात पुणे शहरात देशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. खाद्यपदार्थ विक्रीत वाढ होते..Coconut Farming : बेभरवशाच्या मासेमारीला मिळाला नारळ उद्योगाचा पर्याय.घाऊक बाजारातील नारळाचेआकारानुसार शेकड्याचे भाव (रुपयांमध्ये)नारळ प्रकार १ सप्टेंबर २०२४ १ सप्टेंबर २०२५नवा नारळ १५५० ते १६०० २८०० ते ३०००साऊथ नारळ १६५० ते १७५० २९०० ते ३१००मद्रास २८५० ते २९५० ४८०० ते ५०००पालकोल १९०० ते २००० २९०० ते ३०००सापसोल मोठा २९५० ते ३००० ५४०० ते ५६००सापसोल मीडियम १७०० ते १८०० ३००० ते ३२००.गेल्या महिन्यापासून श्रावण महिना, त्यानंतर गणेशोत्सव सुरू झाल्याने ग्राहकांकडून नारळाला चांगलीच मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे भाव तेजीत आहे. पुढील काही दिवस हे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.दीपक बोरा, नारळाचे व्यापारी, मार्केट यार्ड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.