Agricultural Market: नीरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाच्या बाजारात बुधवारी (ता.२०) मोठी उलाढाल झाली. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गुळाची आवक झाली. बाजार समितीत एकूण ६९१ बॉक्स म्हणजेच सुमारे १३८ क्विंटल गुळाची आवक झाली..बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, गुळाच्या प्रतीनुसार दरात चढ-उतार दिसून आले. लिलावात गुळाला किमान ४४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला..Jaggery Rate: पाडव्याच्या मुहूर्तावर सौद्यात गुळाला ४५०० रुपये दर.तर उत्कृष्ट प्रतीच्या गुळाला तब्बल ४५२५ रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. दिवसाचा सरासरी दर ४४६० रुपये प्रति क्विंटल इतका स्थिर राहिला..Jaggery Rate Market : कर्नाटकी गुळात साखरेच्या गाठी; व्यापाऱ्यांकडून तक्रारी, कोल्हापुरी गुळाला देशभरात मागणी.शेतकऱ्यांसाठी सरासरी दर समाधानकारक ठरल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. .बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना स्वच्छ, नीट पॅकिंग केलेला आणि दर्जेदार माल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.