Meat and Fish Prices Update: आषाढातील शेवटचा रविवार (ता. ९) एकादशीचा असल्याने मांसाहारी प्रेमींचा हिरमोड झाला. त्यामुळे घरगुती ग्राहकांकडून मटण, मासळी व चिकनला मागणी घटली; मात्र हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढल्याने मटण व मासळीचे दर स्थिर राहिले. मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने चिकनच्या दरात किलोमागे १० रुपये, तर इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे २० रुपयांची घट झाली..आषाढातील बुधवारी (ता. ५) ते शुक्रवारी (ता. ७) मांसाहारी पदार्थांना चांगली मागणी होती. रविवारी एकादशी असल्याने मागणी कमी झाली. मंगळवारी (ता. ११) आणि बुधवारी (ता. १२) मटण, मासळी व चिकनला मागणी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. मागणी आणि पुरवठ्यातील समतोलामुळे मासळी, मटण आणि गावरान अंड्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत..Fish Products: ‘रेडी टू इट’ मत्स्य उत्पादनांना ग्राहकांची पसंती.गणेश पेठेतील घाऊक बाजारात आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशातूनही मासळीची आवक होत आहे. आवकेत फारसे वैविध्य नसल्याने विशिष्ट प्रकारच्या मासळीला मागणी आहे. रविवारी (ता. ९) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीतील मासळीची ३०० किलो आणि नदीतील मासळीची सुमारे ५०० किलो आवक झाली. आंध्र प्रदेशातून रहू, कतला आणि सिलन या मासळीची मिळून सुमारे २० टन आवक झाल्याची माहिती मासळी व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली..खोल समुद्रातील मासळी (प्रति किलोचे दर) - पापलेट : कापरी : २०००-२२००, मोठे : १८००-१९००, मध्यम : १४००-१६००, लहान : १२००-१४००, भिला : ९००-१०००, हलवा : १०००-११००, सुरमई १२००-१४००, रावस : १०००-१२००, घोळ : १०००-१२००, करली : ४००-५००, पाला : १०००-१२००, वाम : पिवळी ११००-१३००, काळी : ४००-५००, ओले बोंबील : ४००-५५०. कोळंबी : लहान : ३२०-३६०, मध्यम : ३६०-४८०, मोठी : ५५०-७५०, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ९००-१०००, .Marine Fishing Ban: पाऊस नसल्याने समुद्रातील मासेमारीही बंद.लॉबस्टर : १९००-२२००, मोरी : ४००-५५०, मांदेली : २५०-३००, राणीमासा : ३००-४००, खेकडे : ३००-४००, चिंबोऱ्या : ६००-७००. खाडीची मासळी - सौंदाळे : ३५०-४००, खापी : ३५०-४००, तांबोशी : ६००-७००, पालू : ३००-३५०, लेपा : ४००-४५०, बांगडा : ३२०-४००, शेवटे : २५०-३००, बेळुंजी : १५०-२००, तिसर्या : २५०-३००, तारली : ३००-३५०. नदीतील मासळी : रहू : १५०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ३००-४००, शिवडा : २५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : २५०-४००, चिलापी : ६०-१६०, वाम : ४००-५००..मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०.चिकन : २३०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०.अंडी : गावरान (शेकडा) ११५० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ५८०, डझन ८४, प्रतिनग ७..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.