Ahilyanagar News: अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मुगाची आवक वाढली आहे. सध्या दररोज ९०० ते १२०० क्विटंलपर्यंत आवक होत आहे. प्रति क्विंटल सहा हजार ते नऊ हजार चारशे रुपयांपर्यंत, तर सरासरी ९१०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटलला दर मिळत आहेत..अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, अहिल्यानगर व पारनेर तालुक्यांत सर्वाधिक मुगाची पेरणी होते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने मुगाची जवळपास ४९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. आता बहुतांश बागांत मुगाची काढणी सुरू झाली आहे. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे तर काही काळ पावसाने दिलेल्या खंडामुळे उत्पादनावरही परिणाम झाल्याचे दिसत आहे..Agrowon Podcast: लसूण, हळदीला चांगला उठाव; डाळिंब व गवार तेजीत, पपईची आवक घटली.मुगाची काढणी होत असल्याने बाजारात आवक वाढली आहे. २६ ऑगस्ट रोजी बाजारात ९१६ क्विंटलची आवक झाली. प्रति क्विंटल सहा हजार ते नऊ हजार चारशे रुपयांपर्यंत, सरासरी ९१०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटलला दर मिळाला. २३ ऑगस्ट रोजी ५४६ क्विंटल इतकी आवक झाली..त्याला ८८०० ते ९५०० व सरासरी ९१५० तर २१ ऑगस्ट रोजी ५५६ क्विंटलची आवक झाली, त्याला ७ हजार ते ८ हजार ७०० व सरासरी ७८५० रुपयांचा दर मिळाला. मुगाच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असून जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांतही मुगाची आवक होते, मात्र ती आवक कमी आहे..मुगासोबत उडदाची आवक सुरू झाली आहे. उडदाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. काढणीला काही प्रमाणात सुरुवात झाली. मात्र अजून उडदाची बाजारात आवक सुरू झालेली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.