Nashik News : ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीत कमिशनखोरी व मनमानी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नाशिकचा शाखा व्यवस्थापक व केंद्रातून आलेला आर्थिक सल्लागार यांच्या संगनमताने वरिष्ठ व्यवस्थापनाच्या आशीर्वादाने हा प्रकार घडला. ‘‘कांद्याला दर नसल्याने शेतकरी अडचणीत असताना केंद्राच्या खरेदीत टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार हे परप्रांतीय अधिकारी करीत आहेत,’’ असे सूत्रांनी सांगितले..ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘एनसीसीएफ’ने सुधारणा करण्याऐवजी सोयीने गैरव्यवहार करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना रान मोकळे केले. या प्रक्रियेत राज्यातील एका माजी मंत्र्यांचा ‘ओएसडी’देखील या प्रक्रियेत असल्याचे सूत्रांनी सांगितले..Onion Procurement Scam: नाफेड’, ‘एनसीसीएफ’ कांदा खरेदीत परप्रांतीय रॅकेट.सुरुवातीपासून अध्यक्षांच्या व यापूर्वीच्या शाखा व्यवस्थापकांच्या संपर्कातील खरेदी केंद्रांना दूर ठेवण्यात आले. तर सध्याच्या व्यवस्थापकाने वरिष्ठ व्यवस्थापनाच्या व केंद्रातील मंत्र्यांपर्यंत ज्यांचे लागेबांधे आहेत. त्यांच्याकडून ज्यांच्या शिफारशी आल्या, त्यांनाच कामात प्राधान्य दिले गेले. मात्र असे करताना प्रति किलो १ ते सव्वा रुपया किलोप्रमाणे वसुली करण्यात आली आहे. आता शिल्लक कमिशन वसूल करण्याचा धडाका लावला असल्याचे सूत्रांनी सांगितले.....असा राहिला निवड प्रक्रियेत गोंधळसुरुवातीला २६ मे रोजी जाहीर झालेल्या खरेदी केंद्रांच्या यादीत वरिष्ठ व्यवस्थापन व शाखा व्यवस्थापकांच्या हितसंबंध असलेल्या कंपन्यांची नावे न आल्याने ही यादी रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत सोईची नावे घुसविण्यात आली. .ज्यांना कामे मिळाली त्यातील ठरावीक जवळच्या महासंघांना पोर्टलवर लॉगिन आयडी उघडून देण्यात आला. तर काहींना तो उशिराने देण्यात आला. निविदा प्रक्रियेत जास्त गुणांकन होते, त्यांना हेतुपुरस्सर त्रास देण्यात आला. काहींना गैरप्रकार करण्यासाठी व त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी खरेदी पोर्टलमध्ये खेळ करण्यात आला आहे..NAFED Onion Scam : कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार.गंभीर प्रकार :– कंपन्यांच्या तक्रारीनंतर टप्प्याटप्प्याने एक महिन्यानंतर काम सुरू झाले.– ठरावीक कंपन्यांचे काम बंद करून लागेबांधे असलेल्या कंपन्यांसाठी खरेदीच्या अनुषंगाने पोर्टल परत सुरू करण्यात आले.– निविदेमध्ये ५००० टन साठवणूक क्षमता नसताना काहींकडून खरेदी सुरू असताना काणाडोळा..‘खरेदी मिळविण्यासाठी जो पैसे देईल त्याला काम’ असे शाखा व्यवस्थापक प्रशांत मिश्रा व वरिष्ठ अधिकारी शंकर रेड्डी यांच्या कामाची पद्धत होती. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर कुणाला काम करू द्यायचे, आणि मनमानी करत कुणाचे थांबवायचे, असा प्रकार केला गेला. आता खरेदी संपत आली, मात्र काही ठिकाणी झालेली खरेदी फक्त कागदावर आहे. प्रत्यक्ष खरेदीचा आकडा वेगळा व त्यानुसार गोदामात कांदा नाही, असे प्रत्यक्ष चित्र आहे.-डॉ. दिकपाल गिरासे, सामाजिक कार्यकर्ते, नामपूर, जि. नाशिक.बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीच्या नावाखाली सुरू असलेला हा आर्थिक लूटमारीचा खेळ शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामावर पाणी फेरणारा आहे. यापूर्वी नाफेड, तर गेल्या तीन वर्षांपासून ‘एनसीसीएफ’च्या खरेदीतही गैरव्यवहार सुरूच आहे. मात्र केंद्र सरकार याबाबत मौन बाळगून आहे. – भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.