Agrowon Podcast : कमी आवकेमुळे बाजारात हरभऱ्याला मागणी

Chana Market : देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून हरभऱ्याची आवक कमी झाली. गुणवत्तापूर्ण हरभरा बाजारात नसल्याचं व्यापारी सांगत आहेत. आता हरभऱ्यासाठी विचारणा वाढली आहे.
Chana Market
Chana Market Agrowon
Published on
Updated on

१) कापूस वायद्यांत मोठी वाढ (Cotton Rate)

कापूस वायद्यांमध्ये शुक्रवारी चांगली वाढ झाली होती. कापूस वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात ८०.३८ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले. तर देशातील एमसीएक्सवर कापूस वायदे १ हजार २८० रुपयांनी वाढले होते. ऑगस्टचे वायदे ५७ हजार २६० रुपयांवर बंद झाले.

तर आज बाजार समित्यांमधील दरात अनेक बाजारांमध्ये १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली होती. आज कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळाला. कापूस दरातील सुधारणा टिकू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले (Soybean Market)

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सोयापेंड वायद्यांमध्ये सुधारणा झाली. सोयाबीनचे वायदे १४.४० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३९७ डाॅलर प्रतिटनांवर होते. प्रक्रिया प्लांट्सनी दरात आज ५० ते १०० रुपयांची सुधारणा केली होती. पण बाजारातील सोयाबीन आज स्थिर दिसले.

सोयाबीनला आज ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी टिकून राहिल्यास देशातील बाजारातही दर वाढतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

३) टोमॅटो बाजार तेजीतच (Tomato Market)

राज्यातील बाजारात सध्या टोमॅटो आवक कमी दिसते. तर दुसरीकडे टोमॅटोला मागणी टिकून आहे. त्यामुळे टोमॅटो दरातील तेजी टिकून आहे. राज्यातील सर्वात मोठ्या नारायणगाव बाजारात सर्वाधिक आवक होऊनही सरासरी भाव ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलवर आहेत.

तर इतर बाजारातील सरासरी दरपातळी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटोचे भाव आणखी काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Chana Market
Chilli Crop : जालन्यात पावसाअभावी मिरची पीक धोक्यात

४) लाल मिरची दरातील तेजी कायम (Red Chilli Update)

देशात यंदा लाल मिरचीचे उत्पादन घटले. पण दुसरीकडे देशांतर्गत बाजारात लाल मिरचीला चांगली मागणी आहे. तसचे मिरचीची निर्यातही चांगली वाढली. यामुळे दरातील तेजी कायम आहे.

सध्या लाल मिरचीला प्रतिक्विंटल १८ हजार ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान व्हरायटीनुसार मिळत आहेत. लाल मिरचीची निर्यात सध्या चांगली आहे. त्यामुळे दरातील तेजी पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) हरभऱ्याचे दर वाढतील का? (Chana Rate)

देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून हरभऱ्याची आवक कमी झाली. गुणवत्तापूर्ण हरभरा बाजारात नसल्याचं व्यापारी सांगत आहेत. आता हरभऱ्यासाठी विचारणा वाढली आहे. पण गरजेप्रमाणे हरभरा मिळत नसल्याची चर्चा आहे. कारण व्यापारी, प्रक्रियादार हरभऱ्याला जास्त दर देत नाहीत.

आजही हरभऱ्याची मागणी ४ हजार ९०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान केली जाते. त्यामुळे हरभरा उपलब्ध होत नाही. तर जास्त दरात हरभरा मागणी येत नाही, अशी स्थिती सध्या बाजारात आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे सरकारचा दबाव.

Chana Market
Chana Procurement : हमीभावाने २ लाख ७० हजार क्विंटलवर हरभरा खरेदी

नाफेडकडे सध्या ३८ लाख टन स्टाॅक आहे. या स्टाॅकची विक्रीही नाफेडने सुरु केली. ई लिलावातून ही विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खुल्या बाजारात जास्त दराने व्यापारी, प्रक्रियादार आणि स्टाॅकिस्ट हरभरा खरेदी करत नाहीत. बाजार यंदाच्या हंगामात ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

बाजारात सध्या हरभरा पुरेशा प्रमाणात येत नसला तरी हरभरा बाजाराचे भविष्य काय राहील, याबाबतचं चित्र स्पष्ट नाही. सरकार हरभरा बाजारावरील दबाव वाढवेल का? किती वाढवेल? याची चाचपणी बाजारातील घटक करत आहेत. त्यामुळे हरभरा बाजाराची दिशा सरकारच्या धोरणावर असल्याचं सध्या तरी दिसतं, असं जाणकारांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com