हरभरा खरेदीला केवळ ९५ शेतकऱ्यांचा प्रतिसाद

औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नऊ केंद्रे सुरू करण्यात आली.
Chana Bajar Bhav
Chana Bajar BhavAgrowon

औरंगाबाद जिल्ह्यातील ९ किमान आधारभूत खरेदी (Minimum basic purchase) केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी (Farmer) केवळ ९५ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष हरभरा खरेदीला प्रतिसाद दिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने हरभरा (Chana) खरेदीसाठी नऊ केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांपैकी फुलंब्री, कन्नड, सिल्लोड येथील केंद्रांवर नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही. तर उर्वरित केंद्रावर २७३ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी (Chana Purchase) नोंदणी केली.

Chana Bajar Bhav
Chana BajarBhav : हरभरा उत्पादकांसाठी ही आहे खुशखबर

त्यामध्ये गंगापूरच्या केंद्रात ३८, औरंगाबादच्या केंद्रात ९८, खुलताबादच्या केंद्रात १११, पाचोडच्या केंद्रात २१, सोयगावच्या केंद्रात ३१ व वैजापूरच्या केंद्रावरील ४ शेतकऱ्यांचा समावेश होता.
या पैकी १९४ शेतकऱ्यांना (Farmer) प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठवण्यात आले. त्यामध्ये गंगापूर केंद्रावरील ३८ औरंगाबादचे केंद्र वाडी ते ४० व खुलताबादच्या केंद्रात १११ तर पाचोरा केंद्रात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

पाच हजार २३० रुपये हमी दर
खुलताबाद केंद्रात ९० व गंगापूरच्या केंद्रात ५ शेतकऱ्यांनी मिळून केवळ ९५ शेतकऱ्यांनी आपला हरभरा (Chana) प्रत्यक्ष खरेदीसाठी आणला. या शेतकऱ्यांकडील ७०७ क्विंटल ५० किलो हरभरा ५ हजार २३० रुपये प्रतिक्विंटल या किमान आधारभूत दराने (Minimum basic purchase) खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एस के पांडव यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com