Pune News: मक्याची हमीभावाने खरेदी गोदामांच्या उपलब्धतेअभावी रखडलेली आहे. राज्यात १६४ खरेदी केंद्र सुरू असली, तरी केवळ ६ हजार १७८ टन मक्याचीच खरेदी झाली आहे. सहा जिल्ह्यांमध्ये तर खरेदी केंद्रे सुरू होऊनही एक किलोही खरेदी झालेली नाही. बाजारात मक्याचे भाव जानेवारी २०२५ तुलनेत ४०० ते ५०० रुपयांनी कमी आहेत. .देशात गेल्या पाच वर्षांत मक्याचे उत्पादन ३० टक्क्यांनी वाढले आहे. यंदाही उत्पादन वाढीचा अंदाज आहे. खरिपातील उत्पादन १४ टक्क्यांनी वाढून २८३ लाख टनांवर पोहोचले आहे. तर रब्बीतील लागवडही ७.४ टक्क्यांनी वाढली आहे. पोषक वातावरण असल्याने रब्बीतही उत्पादन वाढीची शक्यता आहे. मक्याचे उत्पादन खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातही होते. यंदा मका उत्पादन ४४० ते ४६० लाख टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे..Maize Rate: राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये मका खरेदीसाठी १६४ खरेदी केंद्र.गेल्या वर्षी ४२३ लाख टन उत्पादन झाले होते.देशातील मका उत्पादन मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले. पण यंदा मक्याचा वापर काहीसा कमी झाला आहे. गेल्या दोन वर्षांत इथेनाॅलसाठी मागणी होती. यंदा इथेनाॅलसाठी मोलॅसिस, उसाचा रस आणि तांदूळ उपलब्ध आहे. यामुळे मक्याच्या वापरला पर्याय आहेत. परिणामी, मक्याला मागणी कमी राहून दरावर दबाव आला आहे..भाव दबावातचसध्या देशात मक्याला प्रति क्विंटल २ हजार ते २ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. महाराष्ट्रात मात्र १७०० ते १९०० रुपयाने मका विकला जात आहे. जानेवारी २०२५ मध्ये मक्याचा सरासरी भाव २५०० रुपयांच्या आसपास होता. महाराष्ट्रातही सरासरी २३०० रुपयाने मका विकला गेला होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत मक्याचा भाव ४०० ते ५०० रुपयांनी कमी आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीतील सरासरी दरात १०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे..Maize Procurement: फुलंब्रीत मका खरेदी केंद्र सुरू.हमीभावाने खरेदी ६ हजार टनांवरराज्यात यंदा हमीभावाने ३ लाख १० हजार टन मका खरेदीचे उद्दिष्ट आहे. मका खरेदीसाठी १६७ केंद्रांना मंजुरी मिळाली असून, १६४ केंद्रे सुरू झाली आहेत. यापैकी सर्वाधिक ४१ केंद्रे बुलडाणा जिल्ह्यात आहेत. नाशिक जिल्ह्यात २१, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०, तर जळगाव जिल्ह्यात १८ केंद्रे सुरू झाली आहेत. राज्यात १३ जानेवारीपर्यंत ६ हजार १७८ टन मका खरेदी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २१७७ टन, बुलडाणा १२४२ टन आणि धुळे जिल्ह्यात ८७२ टन खरेदी झाली आहे..गोदामांची अडचणमका खरेदीत सध्या गोदामांची अडचण आहे. अहिल्यानगर, चंद्रपूर, जालना, नागपूर, चंद्रपूर आणि सातारा जिल्ह्यांत खरेदी केंद्र सुरू होऊनही गोदाम उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष मका खरेदी झालेली नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये खरेदी सुरू झाली तिथेही पुरेशी गोदामे मिळाली नाहीत. मका खरेदीसाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्फत तहसीलदार गोदाम उपलब्ध करून देणार आहेत. बहुतांशी ठिकाणी हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे मका खरेदी रखडलेली आहे. पण पुढील दोन-तीन दिवसांमध्ये हा प्रश्न सोडवला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली..फेब्रुवारीत खरेदी वाढण्याची शक्यतागोदामे उपलब्ध झाल्यानंतर खरेदी गती घेईल. मक्याची खरेदी आतापर्यंत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत जास्त झालेली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर मका पिकाची नोंद नाही पण पीक आहे, अशा शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडून नोंदी करून घेतल्या किंवा अशा शेतकऱ्यांची यादी तहसीलदारांकडून आल्यास प्रश्न सुटू शकतो, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनकडून देण्यात आली. मक्याची खरेदी वाढल्यानंतर मक्याच्या दरालाही आधार मिळेल, असे एकंदर चित्र आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.