Bakri Eid Animal Trading Business: आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील आघाडीची बाजारपेठ असलेल्या लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (ता.२१) शेळी-मेंढी बाजारात बोकडांची विक्रमी आवक झाली. या विशेष बाजारामध्ये तब्बल ३५ ते ४० हजार बोकडांची आवक झाल्याचा अंदाज असून, तब्बल ४ ते ५ कोटी रुपयांची प्रचंड आर्थिक उलाढाल झाली आहे. यंदा बाजारामध्ये बोकडांना २० हजार रुपयांपासून ते थेट दीड लाख रुपयांपर्यंत प्रति नग दर मिळाला..येत्या बुधवारी बकरी ईद सण असल्याने या बाजाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पहाटेपासूनच विविध भागांतील मेंढपाळ आणि शेतकरी आपली जनावरे विविध वाहनांतून घेऊन बाजार आवारात दाखल झाले होते. या बाजाराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर शेजारील कर्नाटक राज्यातील हुबळी, धारवाड, म्हैसूर, बंगळूर, विजापूर तसेच हैदराबाद आणि गोवा या परराज्यांतूनही मोठ्या संख्येने मेंढपाळ व खरेदीदार आले होते. याशिवाय राज्यातील महाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, पंढरपूर या १२ ते १४ जिल्ह्यांतून आलेल्या व्यापारी आणि खरेदीदारांच्या गर्दीने संपूर्ण बाजार आवार फुलून गेला होता..Alephata Livestock Market: आळेफाटा येथील उपबाजारात गाईंची ६५ लाखांची उलाढाल.गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेल्या या बाजारात दुपारी एक वाजेपर्यंत खरेदी-विक्रीची प्रचंड धूम सुरू होती, त्यानंतर बाजार काहीसा ओसरला. बाजार समितीकडे एका बोकडाची किंमत ५० हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीची अधिकृत नोंद झाली असली, तरी प्रत्यक्षात शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील थेट व्यवहारात अनेक बोकडांची विक्री १ ते १.५ लाख रुपयांपर्यंत झाली. बाजारात ५१ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार झाल्यास फटाके फोडून जल्लोष केला जात होता, ज्याने बाजारातील वातावरण अधिकच उत्साही बनवले होते..Livestock Market: खानदेशातील पशुधन बाजारांत गजबज.सर्वसाधारणपणे २५ ते ४० हजार रुपये किमतीच्या बोकडांना बाजारात सर्वाधिक मागणी राहिली आणि त्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. बाजार समितीच्या मुख्य आवारासह बाहेर सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्यांवरही बोकडांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री सुरू होती..या विक्रमी बाजाराबाबत बोलताना लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. सुनील शेळके-पाटील यांनी सांगितले की, बकरी ईद सणामुळे बोकडांची ही मोठी आवक झाली असून, लोणंद बाजार समितीने राज्यातील एक अग्रगण्य बाजारपेठ म्हणून आपला नावलौकिक व दर्जा कायम राखला आहे. तर उपसभापती भानुदास यादव यांनी सांगितले की, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकरी, मेंढपाळ आणि खरेदीदारांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीच्या वतीने पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह आणि उपाहारगृह यांसारख्या सर्व आवश्यक सोयीसुविधा चोखपणे पुरवण्यात आल्या होत्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.