Pune News : उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. बाजारात लिंबाची आवक घटत असताना शहरातील सरबत विक्रेते, रसवंती गृहे तसेच घरगुती ग्राहकांकडून मागणीत वाढ झाली आहे. परिणामी, गेल्या पाच दिवसांत लिंबाच्या दरात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मार्केट यार्डातील सूत्रांनी दिली..सध्या घाऊक बाजारात दर्जानुसार लिंबाला प्रति गोणी ३०० ते ८०० रुपये दर मिळत आहे. एका गोणीत आकारानुसार सुमारे ३०० ते ५५० नगांचा समावेश असतो. मार्केट यार्डात सध्या दररोज सुमारे एक ते दीड हजार गोण्या लिंबाची आवक होत आहे. राशीन (अहिल्यानगर), सोलापूर जिल्हा, तसेच कर्नाटकातील विजयनगर भागातून लिंबाची आवक होत असली, तरी त्याचे प्रमाण मर्यादित आहे..Lemon Farming: दर्जेदार लिंबू, पेरूसाठी उत्राण गावाची ओळख.दरम्यान, उत्पादन क्षेत्रात पाण्याची टंचाई जाणवत असून, त्याचा परिणाम आवकेवर होत आहे. वाढत्या उन्हाळ्यासोबत आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किरकोळ बाजारात सध्या एका लिंबाची पाच रुपये दराने विक्री होत आहे..Lemon Farming: दर्जेदार लिंबू, पेरूसाठी उत्राण गावाची ओळख.शहरासह जिल्ह्यातील किरकोळ विक्रेतेही मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. आवकेच्या तुलनेत मागणीचे प्रमाण वाढत असल्याने येत्या काळात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे..“थंडीच्या काळात लिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होती. मात्र मागणी कमी असल्याने दरात घसरण झाली होती. आता उन्हाचा चटका वाढल्याने मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.”रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी, मार्केट यार्ड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.