Kolhapur News: यंदाच्या हंगामातील गूळ निर्मिती सुरू झाली असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांची संख्या रोडावल्याने गुळाच्या आवकेत घट होत आहे. गुऱ्हाळांतून गुळाची आवक तुलनेने कमी असली तरी मागणीही हवी तेवढी नाही. त्यामुळे दरांमध्ये फारशी वाढ नाही. .येत्या पंधरवड्यात कोणताही सण नसल्यामुळे बाजारात खरेदीचा ओघ मंदावला आहे. विशेष म्हणजे गुजरात व लगतच्या भागात गुऱ्हाळे सुरू झाल्याने तेथील बाजारपेठेतच स्थानिक गरज भागविली जात आहे. परिणामी, कोल्हापूरच्या गुळाला अपेक्षित मागणी मिळत नसल्याचे चित्र आहे..Jaggery Production Project: गूळनिर्मिती प्रकल्प जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देईल.आवक कमी असूनही दर स्थिर राहिले आहेत. सध्या गुळास प्रकारानुसान क्विंटलला ४१०० ते ४२०० रुपये इतका दर मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात गुऱ्हाळे सुरू होण्याची संख्या लक्षणीयरीत्या कमी असल्याचेही चित्र आहे. उत्पादनात घट आणि बाजारातील मरगळ यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संक्रांतीनंतरच बाजारात तेजी वाढेल, अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे..यंदा हंगाम सुरू होण्यावेळी पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याने गुऱ्हाळघरे सुरू होण्यासाठी सध्याचा कालावधी पूरक ठरत आहे. कोल्हापूरबरोबर कर्नाटकातूनही गुळाची निर्मिती वेगात सुरू झाली आहे. यामुळे गुजरातच्या बाजारपेठेतून खास कोल्हापुरी गुळासाठी होणारी मागणी मंदावली आहे. कोल्हापूरच्या तुलनेत कर्नाटकातील गूळ स्वस्त पडत असल्याने गुजरातमधील अनेक व्यापाऱ्यांचा ओढा कर्नाटकच्या गुळाकडेही दिसून येतो. याचा प्रतिकूल परिणाम कोल्हापुरातील गूळ बाजारावर होत आहे..Jaggery Industry: सरकारचा गुळ उद्योगांवर लगाम! नवीन कायद्यानुसार नोंदणी अनिवार्य, ऊस खरेदी-विक्रीचे नवे नियम.दक्षिण गुजरातमध्ये गुऱ्हाळांचा हंगाम जोमात सुरू झाल्याने त्याचा थेट परिणाम कोल्हापूर गूळ बाजारावर होत असल्याचे चित्र आहे. सध्या गुजरातमधील सुरत, तापी, नवसारी, भरूच वलसाड व नर्मदा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गूळनिर्मिती सुरू आहे. स्थानिक तसेच शेजारील राज्यांची मागणी तेथूनच भागवली जात आहे. परिणामी, परंपरेने देशभरात दर्जेदार गुळासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर बाजारात मागणी घटल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले..गुजरातचा गूळ परराज्यांतगुजरातमध्ये साखर कारखान्यांची संख्या मर्यादित असल्याने उसाचा मोठा हिस्सा गुऱ्हाळांकडे वळतो. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत तेथे मोठ्या प्रमाणात गूळ बाजारात येतो. हा गूळ तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेशातील काही बाजारपेठांमध्येही गुजरातचा गूळ पोहोचत आहे. याचा थेट फटका कोल्हापूर, सांगली व सातारा पट्ट्यातील गुळाला बसत आहे..कोल्हापूर बाजार समितीतील गुळाचे दर असे (प्रति क्विंटल रुपये)दर्जा किमान कमाल सरासरी१ ४७०० ४७०० ४७००२ ४३०० ४५०० ४४००३ ३९०० ४२९० ४१५०४ ३५५० ३८९० ३७००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.