Nashik News: खरीप हंगामातील आगाप लाल पोळ कांदा उत्पादनासाठी नाशिक विभाग आघाडीवर असतो. मात्र वाढलेला उत्पादन खर्च, मिळत नसलेला अपेक्षित परतावा यामुळे कांदा उत्पादकांमध्ये लागवडीविषयी नकारात्मकता दिसून येत आहे. तसेच अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे होत असलेल्या कांदा लागवडी प्रभावी झाल्या आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऑगस्टअखेर ५० टक्के लागवड घटली आहे. .रोपांची उपलब्धता झाल्यानंतर जुलैअखेर टप्प्याटप्प्याने कांदा लागवडी सुरू झाल्या. मात्र ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे कांदा उत्पादक पट्ट्यात लागवडीचे नियोजन कोलमडले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यामध्ये गेल्या ३ वर्षांत सरासरी कांदा लागवडीचे क्षेत्र ३० हजार ३०३ हेक्टर इतके क्षेत्र आहे. मात्र यंदा पावसाने अडचणी वाढविल्या. सरासरीच्या तुलनेत २ सप्टेंबरअखेर ११,२९१ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत ७० टक्के लागवडी अद्याप बाकी आहेत..Onion Farming : कांदा रोपे मुबलक; लागवड सुरूच.प्रामुख्याने मालेगाव, चांदवड, येवला तालुक्यांत लागवडी सर्वाधिक आहेत; मात्र पावसामुळे काही ठिकाणी नुकसानही समोर आले आहे. येवला, नांदगाव व बागलाण तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर लागवडी कमी आहेत. काही ठिकाणी झालेल्या कांदा पुनर्लागवडी तर काही ठिकाणी रोपवाटिकांचे नुकसान आहे. त्यामुळे लागवडी जरी झाल्या असल्या तरी संभाव्य उत्पादनावर परिणाम देखील होऊ शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सर्वाधिक लागवडी असलेल्या मालेगाव, चांदवड, येवला तालुक्यांत देखील लागवडी कमी झाल्या आहेत..Onion Purchase Mismatch: कांदा खरेदी साठ्याचा बसेना ताळमेळ.कांदा लागवडी कमी होण्याची कारणेउत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर नसल्याने दुसऱ्या पिकाला पसंती.रोपवाटिका तयार; मात्र वापसा नसल्याने लागवडी मंदावल्या.सततच्या पावसामुळे तयार रोपवाटिकांचे नुकसान.मजूर टंचाईमुळे वेळेवर लागवडी होत नसल्याची स्थिती.शेतकऱ्यांकडे भांडवल नसल्याने कामकाज संथ.पावसाचा अनियमितपणा हे एक प्रमुख कारण आहे. सोबतच कांद्याचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नकारात्मक वातावरण आहे. सिंचनासाठी पाणी असतानाही इतर पिकांना प्राधान्य दिले जात आहे.डॉ. सतीश भोंडे, माजी, अतिरिक्त संचालक राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान.उत्पादन खर्च वाढला आहे. मजूर मिळत नाही. त्यामुळे कांदा लागवडीकडे यंदा कल कमी आहे. त्यामुळे यंदा लागवड कमी झाली आहे. पर्याय म्हणून मका पीक यंदा केले आहे. जनार्दन कमोदकर, कांदा उत्पादक शेतकरी, कोळगाव, ता. येवला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.