Market Trends & Prices: खानदेशात मक्याची आवक गेल्या चार दिवसांत वाढली आहे. दर स्थिर असून, कमाल दर १७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. एप्रिल महिन्यात खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत रोज सरासरी सहा हजार क्विंटल मक्याची आवक होत आहे. जळगाव, चोपडा आणि अमळनेर या भागांत आवक सर्वाधिक आहे..आठ दिवसांपूर्वी मक्यास प्रतिक्विंटल १७०० ते १८०० रुपये इतका दर होता. शिवार आणि थेट खरेदीत काही खरेदीदार व एजंट जास्तीत जास्त १६०० रुपये प्रतिक्विंटल दर देत आहेत. आवक वाढल्याने दर स्थिर झाले आहेत. तसेच, नजीकच्या काळात दरांतील स्थैर्याची स्थिती कायम असेल..Maize Prices Crash: मक्याचा दर हमीभावाच्या खाली, तेलंगणातील शेतकरी अडचणीत, सरकारकडे मदतीची मागणी.जळगाव, चोपडा, अमळनेर या समित्यांत एकत्रितरित्या मिळून रोज सहा हजार क्विंटल मक्याची आवक होत आहे..Maize Procurement: साडेआठ हजार क्विंटल मका खरेदी.धुळ्यातील शिरपूर जनपद समिती, नंदुरबार व शहादा येथेही गेल्या चार दिवसांत मक्याची आवक वाढली आहे. तेथे आवकेत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले..काही शेतकऱ्यांना अद्यापही दरवाढीची अपेक्षा आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मका साठवून ठेवला आहे. तसेच, पावसाळ्यात दरवाढ होईल, या आशेने विक्री पुढे ढकलली आहे. पण अशा शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने यापुढे आवकेत मोठी वाढ होणार नसल्याची स्थिती आहे. त्याचबरोबर थेट शिवारात मका खरेदीही सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.