Parbhani News: परभणी जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या मानवत, सेलू, परभणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खुल्या बाजारातील (खासगी) कापूस खरेदीच्या दरात मागील आठवड्यापासून क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांहून अधिकची घसरण झाली असून कमाल दर ८ हजार रुपयांहून कमी झाली आहे. त्यामुळे नोंदणीकृत शेतकरी कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या केंद्राकडे वळाले आहेत. .परभणी येथे बुधवारपासून (ता.११) पुन्हा सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली आहे. शुक्रवारी (ता.१३) मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची १५०० क्विंटल आवक झाली.त्याला प्रति क्विंटल किमान ७५५० ते कमाल ७८५० रुपये, तर सरासरी ७७५० रुपये दर मिळाले. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची ७५० क्विंटल आवक झाली, सुपर प्रतीच्या कापसाला प्रति क्विंटल किमान ७३७५ ते कमाल ७७७० रुपये, तर सरासरी ७६७५ रुपये दर मिळाले. फरडद कापसाला प्रति क्विंटल ६००० ते ६५०० रुपये मिळाले. परभणी येथे बुधवारपासून (ता.११) सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली आहे..Cotton MSP 2026: कापसाचे दर दबावात; मात्र हमीभावाच्या आसपास.सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.११) कापसाला प्रति क्विंटल किमान ७६०० ते कमाल ७८९० रुपये, तर सरासरी ७७६० रुपये दर मिळाले. मागील दोन दिवसांत १७४ क्विंटल कापसाची खरेदी झाली असून, प्रति क्विंटल किमान ७८६६ ते कमाल ७९३० रुपये दर मिळाले. जिल्ह्यात २०२५-२६ मध्ये कापूस खरेदी हंगाम सुरू झाला तेव्हा दर प्रति क्विंटल ६५०० ते ७५०० रुपयांच्या दरम्यान होते..CCI Cotton Moisture: ओलाव्याच्या मुद्द्यावरून कापूस उत्पादकांची पिळकवणूक.त्यामुळे हमीभावाने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची सीसीआयला पसंती होती. परंतु ८ जानेवारीपासून खुल्या बाजारात दरात सुधारणा झाल्यानंतर कमाल दर प्रति क्विंटल ८ हजार ४०० रुपयांपर्यंत, तर सरासरी दर ८ हजार रुपयांवर पोहोचले. शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे सीसीआयच्या खरेदीला ब्रेक लागला..दरातील तेजी जेमतेम २० ते २५ दिवस टिकून राहिली. ४ फेब्रुवारीपासून खुल्या बाजारातील दर ८ हजार रुपयांपेक्षा कमी झाले. मागील तीन ते चार दिवसांत कापसाच्या दरात क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी घसरले आहेत. किमान दर ८ हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. दरात घसरण झाल्यामुळे क्विंटलमागे ९ हजार रुपये किंवा त्याहून अधिक दर मिळतील या अपेक्षेने पहिल्या वेचणीपासून एकही बोंड कापूस न विकलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.