Jalgaon News: खानदेशात कापूस आवकेत घट झाली आहे. दरही टिकून आहेत. खेडा खरेदीत दर ७३०० ते ७६०० रुपये प्रति क्विंटल, असे आहेत..कापसाची आवक मागील महिन्यात प्रति दिन सरासरी ३० ते ३२ हजार क्विंटल एवढी होती. परंतु मागील तीन-चार दिवसांत कापूस आवकेत घट झाली असून, सध्या प्रति दिन १७ ते १८ हजार क्विंटल एवढी आवक खानदेशात होत आहे..Cotton Import : "पियुष गोयल जी, खोटं बोलू नका"; कापूस आयातीवरून वाणिज्यमंत्र्यांना राहुल गांधींचे प्रत्युत्तर.खेडा खरेदीत कापसाचे दर मागील महिन्यात सरासरी ७४०० रुपये प्रति क्विंटल, असे होते. या महिन्याच्या सुरुवातीपासून खेडा खरेदीतील दर स्थिर आहेत. पण अनेक शेतकऱ्यांना नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कमी दरात कापसाची विक्री करावी लागली आहे..Cotton MSP 2026: कापसाचे दर दबावात; मात्र हमीभावाच्या आसपास.अल्प शेतकऱ्यांकडे जानेवारीत कापूससाठा होता. यामुळे या महिन्यात आवकेत घट निश्चित मानली जात होती. त्यात मागील आठवड्यात कापूस आवकेत सतत घट झाली. कापूस दरात मोठी वाढ मागील महिन्यात झाली. यानंतर दरवाढ झालेली नाही..शेतकऱ्यांकडील साठा संपत आलाशेतकऱ्यांकडील साठा संपत आल्यानेच कापसाची बाजारातील आवक घटली आहे. डिसेंबरमध्ये आवकेत मोठी वाढ झाल्याने दरांवर सतत दबाव होता. जानेवारीत बऱ्यापैकी दर मिळाले. परंतु शेतकऱ्यांकडील साठा आजघडीला १४ ते १५ टक्के एवढाच आहे. दरात फारशी सुधारणा होत नसल्याने अनेकांनी मागील महिन्यात कापसाची विक्री केली. यामुळे गावोगावी शेतकऱ्यांकडील कापूससाठा घटला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.