Market Trends: खानदेशात या महिन्यात केळी व कलिंगडाच्या दरात सातत्याने घसरण झाली आहे. केळीसह कलिंगडाची शिवार किंवा थेट खरेदी केली जात असून, थेट खरेदीत केळीची ४०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल, तर कलिंगडाची ४ ते ७ रुपये प्रति किलो या दराने खरेदी सुरू आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली..त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केळीसह कलिंगडाला उष्णतेचा फटका बसत आहे. याशिवाय पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध व इतर कारणांमुळे दर पाडले जात आहेत. खरेदीदारांची लॉबी अधिक नफा कमावत असून, शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी केली जात आहे..Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत.कलिंगड दर होळीपूर्वीच घसरलेकलिंगडाचे दर होळी सणाच्या सात-आठ दिवसांअगोदरच कमी झाले. या कालावधीत कलिंगडाची आवक कमी असतानाही दर पाडण्यात आले होते. यानंतर २८ फेब्रुवारीच्या सुमारास आखातात युद्ध सुरू झाल्याच्या कारणाचे भांडवल करून कलिंगडाची आणखी कमी दरात खरेदी सुरू झाली. .फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कलिंगडाचे दर २० ते २२ रुपये प्रति किलो होते. फेब्रुवारीअखेरीस ते १२ ते १३ रुपये प्रतिकिलो झाले. युद्धानंतर दर सतत घसरत गेले. आजघडीला कलिंगडाचे दर ४ ते ७ रुपये प्रति किलो आहेत. या परिस्थितीमुळे कलिंगड पिकात एकरी ४० ते ४५ हजार रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे..Fruit Farming Workshop: सीताफळाचे भवितव्य ठरविण्यासाठी पुण्यात कार्यशाळा .केळीची कवडीमोल दरात खरेदीखानदेशातून २ ते ३ टक्के केळीची उन्हाळ्यात आखातात निर्यात होते. उर्वरित केळी उत्तर भारत व इतर भागांत पाठवली जाते. पण युद्ध सुरू होताच केळी निर्यात थांबली. याचा परिणाम केळीच्या खरेदीवर झाला. त्यानंतर केळीचे दर सतत कमी झाले. फेब्रुवारी महिना आणि महाशिवरात्रीच्या काळात केळीचे दर २१०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल होते. सध्या ते ४०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल आहेत. याचा फटका केळी उत्पादकांना बसत असून, शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे..पिके फेब्रुवारीतील दर सध्याचे दर परिणामकलिंगड २०-२२ ४-७ रुपये/किलो एकरी ४०-४५ हजार रुपये तोटाकेळी २१००-२२०० रुपये/क्विंटल ४००-७०० रुपये/ क्विंटल उत्पन्न, खर्चाचा ताळमेळ बसेना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.