Agriculture Economy: खानदेशात केळी दर २३०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक झाले आहेत. अनेक दिवसांनंतर केळीची दर पातळी २३०० वर पोचली आहे. केळी आवक स्थिर असून, मागणी कायम असल्याची माहिती आहे. .खानदेशात सध्या रोज ३८५ ते ४०० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल व मुक्ताईनगर तालुक्यांत रोज मिळून २५० ते २६० ट्रक केळीची आवक आहे. यापाठोपाठ नंदुरबारातील शहादा, तळोदा व नंदुरबार भागांत केळी आवक आहे..Banana Export Growth: राज्यात निर्यातीच्या केळी आवकेत वाढ.केळी दर किमान १३०० व कमाल २३५० रुपये प्रति क्विंटल, असे आहेत. खानदेशात सर्वत्र दर्जेदार केळी उपलब्ध होत आहे. देशात काश्मिर, दिल्ली, पंजाब या भागांतून केळीस अधिकची मागणी आहे. काश्मिरात पाठवणुकीच्या केळीस २३५० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही केळीची कमाल दर पातळी २३०० रुपयांपर्यंत आहे..Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?.देशात मध्य प्रदेशसह गुजरात, आंध्र प्रदेशात केळीची आवक कमी आहे. यामुळे खानदेशसह राज्यातील केळीस उत्तरेकडे उठाव आहे. उष्णतेत रसाळ फळांना मागणी आहे. त्यात कलिंगड, द्राक्ष आवक घटली आहे. यामुळे केळीचा जेवढा पुरवठा, तेवढा उठावदेखील आहे. सर्वाधिक मागणी दिल्ली भागात आहे..निर्यातीस चालनाकेळी निर्यात आखातात सुरू आहे. इराणवगळता अन्य भागांत केळी निर्यात सुरू आहे. खानदेशातून रोज १३ ते १४ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक आखातात विविध कंपन्या किंवा निर्यातदार करीत आहेत. केळीचा दर्जा चांगला असल्याने कंपन्यादेखील केळीची मागणी नोंदवित असल्याची माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.