Khandesh Market Update: खानदेशात मागील १८ ते २० दिवसांत केळीच्या दरात घसरण झाली असून, केळीची आवकही घटली आहे. सध्या दररोज सरासरी ४५ ते ५२ ट्रक केळीची आवक होत आहे. एका ट्रकमधून १६ टन केळीची वाहतूक केली जाते..आगाप कांदेबाग केळीची काढणी पूर्ण झाली असून, हंगामातील कांदेबाग केळीची काढणीही अंतिम टप्प्यात आहे. उशिराच्या कांदेबाग केळीची लागवड कमी असल्याने या बागांमधूनही पुढील काळात खानदेशात केळीची फारशी आवक होण्याची शक्यता नाही. यंदा उष्णतेचा फटका केळीच्या बागांना बसल्याने एकूणच केळीची आवक कमी राहिली आहे..Mrig Bahar Banana Update: मृग बहर केळी ५१ हजार हेक्टरवर.केळीची गुणवत्ता आणि दर्ज्यानुसार दर दिले जात आहेत. सध्या खानदेशात केळीला कमाल १६५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र केळीला उठाव कमी असल्याचे सांगून खरेदीदारांकडून कमी दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे खानदेशातील अनेक केळी उत्पादकांना फटका बसत आहे. सध्या केळीचे किमान दर ६०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत..मागील सात ते आठ दिवसांत खानदेशात केळीच्या आवकेत सतत घसरण झाली आहे. मात्र केळीच्या दरात घट झाली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीच्या लिलावात कमाल १६५१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. तेथे केळीची आवक घटली आहे. दर्जेदार केळी लिलावात फारशी येत नसल्याची स्थिती आहे. दोन ते १४ टन क्षमतेच्या वाहनांतून तेथे केळी आणली जात आहे..Banana Cultivation: खानदेशात केळी लागवडीस गती.सध्या तेथे दररोज सरासरी ४१ ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) केळीची आवक होत आहे. मात्र तेथेही दरात सतत घसरण झाली आहे. बऱ्हाणपूरमधील लिलावानुसार खानदेशात केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते. खानदेशात जळगाव, जामनेर, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, यावल आदी भागांत दर्जेदार आणि निर्यातक्षम केळी उपलब्ध आहे..धुळे, रावेरात आवक घटलीरावेर, मुक्ताईनगर भागांसह धुळ्यातील शिरपूर आणि नंदुरबारातील विविध भागांत केळीची आवक घटली आहे. गणेशोत्सवाच्या काळात खानदेशात दर्जेदार केळीला कमाल १७०० रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला होता. मात्र नवरात्रोत्सवात केळीचे दर घसरल्याने उत्पादकांना मोठा फटका बसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.