Sugar Demand and Supply Update: देशांतर्गत साखर बाजारात गेल्या पंधरवड्यापासून तेजीचे वातावरण असून, साखरेच्या घाऊक दराने प्रति क्विंटल ४ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विविध राज्यांमध्ये साखरेचे घाऊक दर ४,००० ते ४,५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान पोहोचले असून, गेल्या काही महिन्यांतील ही सर्वाधिक दरवाढ मानली जात आहे..२०२५-२६ च्या गाळप हंगामात अपेक्षेपेक्षा कमी साखर उत्पादन, कारखान्यांकडील घटलेला शिल्लक साठा, आगामी हंगामाबाबतची अनिश्चितता आणि सणासुदीच्या वाढत्या मागणीमुळे बाजारात तेजी कायम असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले..Bhimashankar Sugar Factory: ‘भीमाशंकर’कडून खोडवा उसास प्रति टन १०० रुपये जमा.यंदा जून आणि जुलैच्या सुरुवातीला अनेक ऊस उत्पादक भागांत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे उसाची वाढ मंदावली असून, पुढील गाळप हंगामात साखर उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी, मिठाई उत्पादक आणि मोठे ग्राहक आगाऊ खरेदीकडे वळल्याने दरांना आणखी आधार मिळाला आहे..Sugar Sales Quota: जुलैसाठी महाराष्ट्राच्या साखर विक्री कोट्यात ७.७१ टक्के घट.ऑगस्टपासून सुरू होणारा सणासुदीचा हंगाम, त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि लग्नसराईमुळे साखरेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही आठवडे साखरेतील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यापारी आणि बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे..घाऊक बाजारातील वाढीचा परिणाम किरकोळ बाजारावरही दिसून येत असून, साखरेचा दर ५० रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. दरम्यान, वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर तुटवड्याच्या चर्चांना ‘नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड’ ने (एनएफसीएसएफ) फेटाळून लावले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.