Pune News : केंद्र सरकारने चालू हंगामात साखर निर्यातीवर निर्बंध कायम ठेवत केवळ १० लाख टन साखर निर्यातीलाच परवानगी दिली होती. पण आता नव्या हंगामात देशातील साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. देशात साखरेचा पुरवठा जास्त होणार असल्याने नव्या हंगामात सरकार साखर निर्यात खुली करण्याची शक्यता आहे..भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र मागील दोन हंगामांमध्ये देशात उसाची लागवड कमी होऊन साखर उत्पादनावर परिणाम झाला होता. देशात २०२३ मध्ये साखर उत्पादन कमी झाले होते. मागील हंगामातही गाळपासाठी उसाची उपलब्धता कमीच होती. मात्र यंदा देशात उसाची लागवड वाढली आहे. मागील हंगामात देशात ५५ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. .Sugar Industry: उद्योगाचा गाडा रुळावर आणा.तर यंदा ५७ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाल्याचे सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तर जाणकारांच्या मते यंदाची लागवड यापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रासह महत्त्वाच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये यंदा लागवड वाढली आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या गाळप हंगामात उसाची उपलब्धता अधिक राहणार आहे. परिणामी देशातील साखर उत्पादनातही वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा विचार करून केंद्र सरकार नव्या हंगामात साखर निर्यातीवरील सर्व बंधने उठवू शकते, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले..आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहता साखरेच्या दरावर आधीच दबाव आहे. साखरेचा भाव आजही नीचांकी दरपातळीच्या भोवती फिरत आहे. त्यात भारताने जागतिक बाजारात निर्यात सुरु केल्यास त्याचा बाजारावर आणखी दबाव येईल. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती कमी कमी असल्याने निर्यातही वेगाने होण्याची शक्यता कमीच असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. चालू हंगामात केवळ १० लाख टन निर्यातीचा कोटा दिला होता. आतापर्यंत हा कोटाही पूर्ण झालेला नाही. निर्यात आठ लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल, असे अभ्यासकांचे मत आहे..‘साखरेची निर्यात सुरु झाल्यानंतर केंद्र सरकारला देशांतर्गत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीची रक्कम वेळेत मिळण्यास मदत होईल,’असेही अधिकाऱ्यांचे मत आहे.अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे संयुक्त सचिव अश्विनी श्रीवास्तव यांनी एका जागतिक परिषदेत बोलताना सांगितले की, येणाऱ्या गाळप हंगामात साखर निर्यातीला वाव असेल. पण, आगामी हंगामात नेमकी किती साखर निर्यात केली जाऊ शकते, याबाबत ते स्पष्ट बोलले नाहीत. .Sugar Recovery Theft: इथेनॉलच्या नावाखाली उतारा चोरीचा संशय .पुढील हंगामात देशांतर्गत वापर आणि इथेनॉल निर्मितीसाठी लागणारी गरज पूर्ण केल्यानंतर निर्यातीसाठी साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असेल, असा सध्याचा अंदाज आहे. श्री. श्रीवास्तव म्हणाले, ‘‘पुढील हंगामात देशातील साखरेचा वापर चालू वर्षाच्या २८० लाख टनांवरून २८५ ते २९० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. देशात नवीन विपणन वर्षाच्या सुरुवातीला आधीचा ५० लाख टन साखरेचा शिल्लक साठा असेल. त्यामुळे यंदा देशात साखरेचा पुरवठा चांगला राहू शकतो.''.आगामी हंगामात उसापासून ४.८ अब्ज लिटर इथेनॉलचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे, असल्याचा अंदाज श्री. श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. इंडियन शुगर आणि बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २०२५/२६ विपणन वर्षात साखर उत्पादन ३४९ लाख टनांपर्यंत जाईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.