Pune News: अमेरिकेने इतर देशांच्या तुलनेत भारतातून आयात होणाऱ्या कोळंबीवर सर्वाधिक शुल्क लावले आहे. त्यामुळे भारताच्या २०० कोटी डॉलर्स मूल्याच्या कोळंबी निर्यातीतील अडचणी वाढल्या आहेत. या संकटातून कोळंबी उद्योगाला बाहेर काढण्यासाठी तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी सी-फूड असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्र सरकारकडे केली आहे..अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कोळंबी आयातीवर ५० टक्के आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेला होणारी कोळंबी निर्यात अडचणीत आली आहे. अमेरिका भारताच्या कोळंबीची मोठी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ आता हातून जाण्याची वेळ आली आहे. तसेच कोळंबीसाठी नवे मार्केट तयार होण्यासाठी वेळ लागेल. तोपर्यंत कोळंबी उद्योगाला सरकारच्या मदतीची गरज आहे. सीफूड एक्स्पोर्ट असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे..Trump Trade Tariffs : अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीमुळे कापड, कोळंबी, सोयापेंडला फटका.खेळत्या भांडवलात ३० टक्के वाढ करावी, व्याज सवलत आणि कोळंबी प्री व पोस्ट पॅकेजिंगसाठी कर्ज परतफेडीसाठी २४० दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कोळंबी उद्योगाने केली आहे..‘‘भारताने अमेरिकेला २०२४ मध्ये एकूण २८० कोटी डॉलर्सची कोळंबी निर्यात केली होती. तर चालू वर्षात आतापर्यंत ५० कोटी डॉलर्सची कोळंबी निर्यात झाली आहे. परंतु आता अमेरिकेच्या वाढीव आयातशुल्कामुळे भारताची कोळंबी इक्वेडोर, चीन, व्हिएतनाम आणि थायलंडपेक्षा महाग होणार आहे. कारण इक्वेडोरवर केवळ १५ टक्के आयात शुल्क लावले आहे. तर चीनवर ३० टक्के, व्हिएतनामवर २० टक्के तर इंडोनेशियावर १९ टक्के आयात शुल्क लागू केले आहे,’’ असे सी-फूड असोसिएशन ऑफ इंडियाचे महासिचव के. एन. राघवन यांनी सांगितले..Fish Farming : कोळंबी संवर्धनातून निर्माण केली यशाची पायवाट.‘‘अमेरिकेचा बाजार हातचा जात असताना नवे मार्केट विकसित करण्यासाठी वेळ जाईल. तशा नव्या पाच बाजारपेठा आहेत. परंतु तेथे निर्यात लगेच काही वाढणार नाही. युके सोबत मुक्त व्यापार करार झाला तरी तेथे आपल्या मालाचा खप वाढण्यासाठी वेळ लागणार आहे. कोणत्याही मालाचे मार्केट रातोरात काबीज करता येत नाही,’’ असेही श्री. राघवन यांनी स्पष्ट केले.....असे केल्यास पुन्हा ४० टक्के दंडआशियातील देशांचा विचार करता भारतावर सर्वाधिक आयात शुल्क लागू केले आहे. त्यामुळे अमेरिकेतील कोळंबी बाजारातील हिस्सा आशियातील इतर देश काबीज करू शकतात. तसेच या आयात शुल्कापासून बचाव करण्यासाठी इतर देशांच्या मार्गे अमेरिकेच्या बाजारात निर्यात करणेही शक्य नाही. कारण असे केल्यास पुन्हा ४० टक्के दंड लावला जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.