Pune News: राज्यात मक्याचे भाव कमी झाल्यामुळे सरकारी खरेदी केंद्रांवर शेतकरी मका विक्रीसाठी गर्दी करत आहेत. परंतु राज्यासाठी केवळ ४८ हजार ५०० टन मका खरेदीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मका खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी शेतकरी, केंद्रचालक करत आहेत. या पार्श्वभूमीवर मार्केटिंग फेडरेशनने राज्य सरकारकडे १ लाख ७० हजार टन मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मागितले आहे. परंतु अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही..गेल्या काही हंगामात मक्याला चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मक्याची लागवड वाढवली. देशात यंदा मक्याचे उत्पादन वाढले. पण इथेनॉलसाठी तांदूळ आणि उसाची उपलब्धता वाढल्यामुळे मक्याचा उठाव कमी झाला. याचा दबाव मक्याच्या दरावर मागील काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यातच भारत-अमेरिका व्यापार करारात अमेरिकेतून डीडीजीएस आयातीला परवानगी दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मक्याचे दर आणखीनच कमी झाले..Maize MSP: तीन महिन्यांपासून मक्याचे पैसे थकीत.केंद्र सरकारने यंदा मक्याला प्रति क्विंटल २ हजार ४०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या मक्याचा भाव १६०० ते १९०० रुपयांच्या दरम्यान आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा ५०० ते ८०० रुपये कमी मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत..Maize Price: व्यापार कराराचा मक्यावर दबाव.मार्केटिंग फेडरेशनने सरकारकडे १ लाख ७० हजार टन मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मागितले आहे. आतापर्यंत मका खरेदीला कमी प्रतिसाद होता. १७ फेब्रुवारीपर्यंत केवळ साडेतीन हजार टन खरेदी झाली. पण आता हमीभाव आणि बाजारभावातील फरक वाढल्यामुळे अनेक जिल्ह्यांत शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रांवर मका विक्रीसाठी गर्दी करत आहेत. पण राज्यात केवळ ४८ हजार ५०० टन मका खरेदीचे उद्दिष्ट आहे. मका खरेदीचे जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात आले आहे. उत्पादन जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होत आहे. उद्दिष्ट कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी मका खरेदी थांबणार आहे..मका आहे पण नोंद नाहीगेले दोन वर्षे मक्याला चांगला भाव होता. परिणामी हमीभावाने मका विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नव्हती. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी मक्याची लागवड करूनही सात-बारा उताऱ्यावर मक्याची नोंदच केली नाही. पण मका खरेदी करताना शेतकऱ्यांना ऑनलाइन सात-बारावर मक्याची नोंद सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे ही अट शिथिल करून तलाठ्यांनी मका नोंद असलेला सात-बारा दिल्यानंतर हमीभावाने मक्याची खरेदी करावी, अशी मागणीही शेतकरी करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.