Kolhapur News: गेल्या आठ दिवसांपासून साखरेच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. गणेशोत्सव आणि आगामी सणांमुळे वाढलेली मागणी हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. .देशातील घाऊक बाजारपेठेत साखरेचे दर सध्या ३७०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, काही राज्यांत मागणी अधिक असल्याने ३९०० रुपयांपर्यंतही दर मिळत आहेत. या दरवाढीमागे केंद्र सरकारचे ऑगस्ट महिन्यासाठी जाहीर झालेले साखर विक्रीचे मर्यादित धोरण आणि सणासुदीची वाढती मागणी ही दोन प्रमुख कारणे आहेत..Sugar Industry: साखर निर्यात, इथेनॉलबाबत केंद्राने धोरण स्पष्ट करावे.केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी २२.५ लाख टन साखर विक्रीचा कोटा मंजूर केला आहे. हा कोटा गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत थोडा कमी आहे, तर ऑगस्ट २०२३ च्या २५ लाख टन कोट्याच्या तुलनेत लक्षणीय कमी आहे. कोटा कमी असल्याने बाजारात साखरेची उपलब्धता मर्यादित होते, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच ही दरवाढ स्पष्ट झाली. तर जुलै महिन्यात ३६०० ते ३७०० रुपये प्रति क्विंटल असलेले दर आता ३८०० रुपयांपर्यंत गेले आहेत..Niphad Sugar Factory: ‘निसाका’ विक्रीला सभासद, कामगारांचा विरोध.कारखान्याकडून मर्यादित विक्रीदिवाळीपर्यंत साखरेचे दर चांगले राहतील, असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. केंद्राने यंदा साखर उत्पादन कमी झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक महिन्यात एक ते दोन लाख टन साखरेचा कोटा कमी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदाचा हंगाम सुरू होण्याअगोदर देशात मुबलक साखर साठा राहावा असा प्रयत्न केंद्राचा आहे. साखर कोटे कमी दिल्याने बाजारात कारखान्याकडून साखरेची मर्यादितच विक्री होत आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून साखरेचे दर सातत्याने ३६०० रुपयांवर असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले..साखर खरेदीत वाढकेंद्राला पुढील हंगाम सुरू होईपर्यंत देशात मुबलक साखर साठा ठेवायचा आहे. अतिरिक्त साखर विक्री होऊन साखरेची टंचाई होऊ नये यासाठी केंद्र पुढील दोन महिन्यांमध्ये आणखी साखर कोटे कमी देईल असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. सणासुदीमुळे मागणी वाढल्यास पुन्हा दर वाढतील या अपेक्षेने व्यापाऱ्यांनी आतापासूनच साखर खरेदी थोडी थोडी वाढवली आहे. यामुळे साखरेच्या दरात वाढ कायम आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.