Cotton Market: कापसाचा भाव सलग दोन वर्षे दबावात राहिला. यामुळे शेतकरी अडचणीत तर आलेच, पण आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षाही भाव कमी असल्याने उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहेत. सीसीआय विक्रमी कापूस खरेदी करत आहे. पण या खरेदीचा केवळ ३२ टक्के शेतकऱ्यांना आणि चांगल्या प्रतीच्या कापसालाच लाभ होत आहे.