Nashik News: राज्यभरात टोमॅटोच्या आवकेत पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चालू हंगामात ऑक्टोबरमध्ये सोमवारी (ता. ६) ५ लाख ४० हजार ३९० क्रेटची विक्रमी आवक झाली. आजपर्यंत एकाच दिवसात सर्वाधिक आवक झाल्याचा नवा विक्रम मुख्य बाजार आवारात नोंदवला गेला आहे. या दिवशी प्रतिक्रेट किमान ४०, कमाल ४०१ तर सरासरी ३५५ रुपये असे दर मिळाले होते..पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारावर मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची आवक होते. रोख पेमेंट व विक्रीसह बाजार समितीने शेतकरी, व्यापारी, आडते यांच्याकरिता सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आवक व व्यवहार वाढलेले आहेत. प्रामुख्याने चांदवड तालुक्यातून ही आवक होत आहे. यासह निफाड, दिंडोरी व नांदगाव तालुक्यांतूनदेखील आवक होत आहे..Tomato Farming: टोमॅटो लागवडीत पीक संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर.मुख्य बाजार आवारावर १६ ऑगस्ट २०२३ पासून लिलाव केले जात आहेत. यापूर्वी २०२३ मध्ये विक्रमी ४ लाख क्रेटचा टप्पा ओलांडला होता. तर आता ऑक्टोबर २०२५ मध्ये ५ लाख क्रेट आवकेचा टप्पा ओलांडला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो पिंपळगाव बसवंत मुख्य बाजार आवारावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर, उपसभापती ज्ञानेश्वर शिरसाट, संचालक मंडळ व प्रभारी सचिव संज्योत जाधव यांनी केले..शेतकऱ्यांचा हिरमोडमागील वर्षी चांगले दर राहिल्याने शेतकऱ्यांचा टोमॅटो लागवडीकडे कल होता. मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबरपर्यंत चांगली आवक होती. सप्टेंबरमध्ये प्रतिक्रेट ५५५ रुपये तर ऑक्टोबरमध्ये ७७५ पर्यंत दर मिळाले होते. यंदा चालू हंगामात ऑगस्ट महिन्यात सरासरी ६२५ रुपये क्रेट सर्वाधिक दर मिळाला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सरासरी २६० रुपये दर मिळाले. तर आता बुधवारी(ता. ८) किमान ४०, कमाल ३७५ ते सरासरी २५५ रुपये दर मिळाले. सध्या अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांचा काहीसा हिरमोड झाला आहे. .Tomato Rate: पिंपळगाव बसवंत येथे टोमॅटो दर घसरले .गेल्या पाच वर्षांतील आवकेचे विक्रमदिनांक क्रेट आवक(२० किलो प्रत्येकी)२८ ऑक्टोबर २४ ३ लाख ०६ हजार ४८५३ ऑक्टोबर २०२३ ४ लाख ४७ हजार ३९५६ ऑक्टोबर २०२२ २ लाख ७२ हजार ६८५१३ ऑक्टोबर २०२१ ३ हजार २८ हजार ५५५२८ ऑक्टोबर २०२० २ लाख ९७ हजार ७८५.शेतकऱ्यांनी अपेक्षेने टोमॅटो लागवडी केल्या होत्या. मात्र पंजाबमधील पूरस्थिती, बांगलादेशमध्ये कमी निर्यात यामुळे आवक वाढत तर पुरवठा कमी झाला. त्यामुळे अपेक्षित दर शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाहीत. यंदाचा हंगाम काहीसा अडचणीचा आहे. मात्र शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा टोमॅटो उत्पादन घेतले आहे.आमदार दिलीप बनकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.