Grape Farmer Crisis: अति पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक झळ
Heavy Rainfall Crisis: गत वर्षी अति पावसाच्या तडाख्याने राज्यातील द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले. तसेच पोषक वातावरणाअभावी सुमारे ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले. परिणामी शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्नच आले नाही. यंदा बाजारात द्राक्षाला चांगले दर मिळूनही शेतकऱ्यांचा पदरी तोटाच पडला आहे.